Vastu Tips: रात्री झोपताना या दोन दिशांनाच करावं डोकं, वास्तुशास्त्रात सांगितल्यात या महत्त्वाच्या गोष्टी
- Published by:Ramesh Patil
- trending desk
Last Updated:
Vastu Tips Marathi: चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणं महत्त्वाचं आहे. झोपताना नेमक्या कोणत्या दिशेला पाय करून झोपायचं, याचा कधी विचार करता का? चुकीच्या दिशेला पाय करून झोपलात, तर त्याचा जीवनावर वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे योग्य दिशेला पाय करून झोपणं खूप महत्त्वाचं आहे.
झोपताना कोणत्या दिशेला पाय करावं, हे अनेकांना माहिती नसतं. परंतु माहितीच्या अभावामुळे काही चुकीच्या गोष्टी झोपताना केल्या जाऊ शकतात. अशा गोष्टींचा जीवनावर मात्र वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जीवनात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. यापैकी एक म्हणजे चुकीच्या दिशेला पाय करून झोपणं. कोणत्या दिशेला पाय करून झोपावं, यासाठी वास्तुशास्त्रात दिशाही निश्चित केली आहे
advertisement
advertisement
वास्तुशास्त्रानुसार कोणत्याही व्यक्तीनं झोपताना आपले पाय दक्षिण दिशेला करून झोपू नये. कारण दक्षिण दिशेला यमदूत, यम आणि नकारात्मक शक्तीची दिशा म्हणतात. दक्षिण दिशेला पाय करून झोपल्यास मनामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होते. याशिवाय भीतिदायक स्वप्नंही पडतात. त्याचबरोबर अशी व्यक्ती निराशा आणि भीतीलाही बळी पडू शकते. ती व्यक्ती नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं अस्वस्थ असते.
advertisement
तसंच वास्तुशास्त्रानुसार कधीही पूर्व दिशेला पाय ठेवून झोपू नये. पूर्व ही सूर्योदयाची दिशा आहे. पूर्व दिशेला पाय ठेवून झोपल्यानं व्यक्तीच्या शरीरात नकारात्मक परिणाम दिसून येतात. त्या व्यक्तीच्या मनात नकारात्मक विचार येतात. त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीनं झोपताना पायांच्या दिशेची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे
advertisement
झोपण्याची योग्य पद्धत कोणती असावी, याविषयी वास्तुशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. धार्मिक ग्रंथानुसारही झोपताना व्यक्तीचं डोकं दक्षिण किंवा पूर्व दिशेनं असले पाहिजे. म्हणजेच पाय हे उत्तर व पश्चिम दिशेला असले पाहिजेत. ही झोपण्याची योग्य पद्धत समजली जाते. अशा पद्धतीनं झोपणं, हे व्यक्तीच्या आरोग्यासाठीही फायदेशीर मानलं जातं.









