त्याचा पिता गाढव असेल! 12 व्या शतकातील शिलालेख, देवाला दिलेल्या दानाबाबत थेट उल्लेख
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Sangli Temple: सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे इथं 12 व्या शतकातील शिलालेखाचे वाचन करण्यात यश आलंय. यात सागरेश्वर मंदिराच्या दानाबाबत उल्लेख आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यामध्ये देवराष्ट्रे इथं प्राचीन मंदिरांचा एक मोठा समूह आहे. त्यात जवळपास 51 मंदिरे असून सागरेश्वर हे मुख्य मंदिर शंकराचे आहे. मंदिराच्या आवारात असणाऱ्या अनेक वर्षे अपरिचित राहिलेल्या शिलालेखाची उकल आणि त्याचे वाचन इतिहास अभ्यासक कृष्णा गुडदे आणि अतुल मुळीक यांनी केले.
advertisement
advertisement
श्री सागरेश्वर मंदिराच्या डाव्याभिंतीला लागून कुंडाजवळ दोन शिलालेख आहेत. यामधील एक दुर्बोध झाला असून दुसरा ही खुप खराब झाला आहे. सदर शिलालेख 87 सेंमी उभा असून 41 सेंमी रुंद आहे. तर 18 सेंमी जाड आहे. शिलालेख एकूण सहा ओळींचा आहे. सर्वात वर सूर्य, चंद्र आणि शिवपिंडी, नांगर कोरले आहेत. त्याजवळ देवाचे नाव कोरले आहे. तर सर्वात खाली गाय तसेच राजाचे राज्य चिन्ह तलवार कोरण्यात आली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement