धुलिवंदनाचं निमित्त आणि बाप्पाला 2000 किलो द्राक्षांचा नैवेद्य! श्रीमंत दगडूशेठ गणपतीचे PHOTO
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
Dagdusheth Ganpati: पुण्यात सर्वत्र धुलिवंदनचा उत्साह आहे. श्रीमंत दगडूशेठ गणपतीची खास पूजा बांधण्यात आली असून तब्बल 2 हजार किलो द्राक्षांची बाप्पांना आरास करण्यात आली आहे.
advertisement
advertisement
काळ्या आणि हिरव्या रंगाच्या द्राक्षांनी गणपती मंदिरातील गाभारा व सभामंडप सजवण्यात आला आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये नाशिक येथील सह्याद्री फार्म कंपनीच्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या निर्यातक्षम व रसायनविरहित द्राक्षांची आरास करण्यात आली.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
द्राक्षे खाल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि हिमोग्लोबिन पातळी वाढते. हिरवी द्राक्षे हिमोग्लोबिन वाढवतात. त्यामुळे द्राक्षांचे सेवन करणे हे आरोग्यदृष्टया उपयुक्त असल्याने अनाथाश्रम, वृद्धाश्रम व ससून रुग्णालयात द्राक्षांचे प्रसादरुपी वाटप करण्यात येणार आहे, असे ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने यांनी सांगितले.