काय सांगता! घरावर कोणीच वापरत नाही कवेलू, श्रद्धेने पाळतात गावकरी इथं परंपरा
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देवुरवाडा हे गाव देवाचा वाडा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर या गावात कवेलू कधीच वापरल्या जात नाहीत.
advertisement
आताही कुठेच कवेलू दिसत नाहीत. अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील देऊरवाडा हे गाव देवाचा वाडा म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्याचबरोबर या गावात कवेलू कधीच वापरल्या जात नाहीत. ज्या वेळी घर बांधण्यासाठी काहीच मिळत नव्हतं त्यावेळी तेथील नागरिकांनी गवत आणि काठी वापरून घराचे छत तयार केले पण कधीही कौलारू घरे बांधली नाहीत.
advertisement
देऊरवाडा या गावात कौलारू घरे का दिसत नाहीत? याबाबत तेथील ग्रामस्थांशी लोकल 18 च्या प्रतिनिधीने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की यामागे खूप मोठी आख्यायिका आहे. आमच्या गावात भगवान नृसिंह यांची स्वयंभू मूर्ती आहे. त्याचबरोबर गावातून वाहणारी पयोष्णी नदी सुद्धा या गावातील आख्यायिकेचा भाग आहे. भगवान विष्णू यांचे अवतार आहेत. मच्छ, कच्छ, वराह आणि नृसिंह. म्हणजेच विष्णूचा चौथा अवतार हे नृसिंह भगवान आहेत.
advertisement
पुढे ते सांगतात की, नृसिंह भगवान यांनी हिरण्यकशिपु याचा वध नखांनी केला. त्यानंतर नृसिंह भगवान यांच्य नखात दाह पेटला होता. तो दाह शांत करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. त्यानंतर ते पयोष्णी तीरावर आलेत. त्याठिकाणी असलेल्या करशुद्धीतीर्थावर आपली नखे पाण्यात बुडवली त्यानंतर त्यांच्या नखांतील दाह शांत झाला. तेव्हापासून नृसिंह भगवान या ठिकाणी स्थायिक झालेत. देऊरवाडा यागावात नृसिंह भगवान यांची स्वयंभू मूर्ती आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement