नवीन वर्षाची सुरुवात अंबादेवीच्या दर्शनानं, घरबसल्या घ्या दर्शन, PHOTOS
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
अंबादेवी मंदिरात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी भक्तांची प्रचंड गर्दी बघायला मिळाली. नवीन वर्षाच्या दिवशी अनेक माता भगिनींनी अंबादेवीची ओटी भरली.
advertisement
अमरावती मधील अंबानगरी चौक येथे अंबादेवी आणि एकवीरा देवीचे पुरातन मंदिर आहे. या मंदिराला मोठा इतिहास लाभलेला आहे. भगवान श्रीकृष्णांनी रुक्मिणी मातेसोबत विवाह याच अंबादेवी मंदिरात केल्याची आख्यायिका आहे. अंबादेवी मंदिरातून श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथे गुफा निघालेली आहे, असेही येथील नागरिक सांगतात.
advertisement
अमरावतीवरून 30 किलोमिटरवर असलेल्या कौंडण्यपूर येथून येणाऱ्या गुफेतूनच भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी मातेला घेऊन आले होते, त्यांनी नंतर अंबादेवीच्या आशीर्वादाने विवाह केल्याचे देखील मंदिराच्या कोषाध्यक्ष सांगतात. अंबादेवी नवसाला पावते, त्यामुळे नवीन वर्षाच्या दिवशी अनेक माता भगिनींनी अंबादेवीची ओटी भरली. ओटी भरून तिला नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आणि हे नवीन वर्ष सुखाचे जावो, असं मागणं मागितलं.
advertisement
advertisement
अमरावतीमधील अंबादेवी ही स्वयंभू असल्याने भक्तांची तिच्यावर अपार श्रध्दा आहे. अंबादेवी ची मूर्ती ही वालुकामय पाषाणाची असून ती पद्मासनात बसलेली आहे. अमरावती मधील अनेक भक्त आज नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी अंबा बाईच्या दर्शनाला आलेत. हार फुल आणि नारळ देवून सर्वात जास्त आज अंबादेवीची ओटी भरण्यात आली. अंबादेवी आणि एकवीरा देवी हे दोन्ही मंदिर एकाच परिसरात आहेत.
advertisement









