Lalbaugcha Raja: ‘लालबागचा राजा’च्या दर्शनासाठी रांगा, यंदाच्या गणेशोत्सवात खास थीम, PHOTOS
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Lalbaugcha Raja: लालबागच्या राजाची मूर्ती यंदा वात्सल्याने भरलेली असून तिला सोनेरी अलंकारांनी सजवले आहे. दर्शनासाठी पहाटेपासूनच रांगा लागल्या आहेत.
गणेशोत्सवाला गणेश चतुर्थीपासून प्रारंभ होत असून ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवसापासून प्रचंड गर्दी उसळते. हजारो भाविक गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवसापासूनच रांगेत थांबतात आणि प्रतिष्ठापनेनंतरच्या सकाळपासून चरणस्पर्श व मुखदर्शनासाठी अखंड रांग सुरु असते. मुंबईतूनच नव्हे तर राज्यभरातून आणि देशाबाहेरूनही भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात.
advertisement
advertisement
advertisement
लालबागच्या राजाची प्रतिष्ठापना आज पहाटे 5:00 वाजता अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांच्या हस्ते झाली असून सकाळी 6:00 वाजता रांगा खुल्या झाल्या. लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दोन प्रमुख रांगा आहेत. ‘नवसाची’ रांग (चरणस्पर्श) आणि ‘मुखदर्शनाची’ रांग. प्रत्यक्ष येणाऱ्या भाविकांसोबतच देश-विदेशातील भक्तांसाठी मंडळाने ऑनलाईन दर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे, जी आजपासून अनंत चतुर्दशीपर्यंत अखंड सुरू राहणार आहे.
advertisement









