Hanuman Jayanti 2025: पनवती, काट्या अन् दुतोंड्या, नाशिकमध्ये प्रसिद्ध आहेत ही 6 हनुमान मंदिरे

Last Updated:
Hanuman Jayanti 2025: नाशिक ही प्रभू रामचंद्र आणि रामायण काळाशी जोडलेली नगरी म्हणून ओळखली जाते. याच नाशिकमध्ये काही हनुमान मंदिरे प्रसिद्ध आहेत.
1/7
नाशिक ही धार्मिक नगरी म्हणून ओळखली जाते. प्रभू रामचंद्रांचे वनवासाच्या काळात या परिसरात वास्तव्य होते. त्यामुळे रामायणाशी संबंधित घडामोडींचं साक्षीदार असणारं शहर म्हणून देखील नाशिकला ओळखलं जातं. रामभक्त हनुमानाची देखील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. अशाच 6 मंदिरांबाबत जाणून घेऊ.

advertisement
2/7
गोमय मारुती: श्री समर्थ रामदास स्वामी यांनी आगरटाकळी इथं स्वत:च्या हातांनी मारुती मंदिराची स्थापना केली. याला गोमय मारुती म्हणून ओळखलं जातं. समर्थ 12 वर्षे गोदाकाठी वास्तव्यास होते. इथं त्यांनी रामनामाचा जप केला. तसेच स्वत:च्या हाताने गोमय अर्थात गायीचे शेण आणि माती यांच्य मिश्रणातून हनुमान मूर्तीची स्थापना केलायाचं सांगितलं जातं.

3/7
दुतोंड्या मारुती: अहिल्याराम व्यायामशाळेसमोर दुतोंड्या मारुतीचे शिल्प 1942 च्या सुमारास उभारण्यात आले. दोन्ही दिशांना  तोंड असल्याने या हनुमानाला  दुतोंड्या मारुती म्हटले जाते. मूर्तिकार शंकरराव परदेशी यांनी ही मूर्ती बनवली. आज हाच 11 फुटी दुतोंड्या मारुती गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता मोजण्याचे एक साधन बनला आहे.

4/7
बटुक हनुमान: तपोवन परिसरातील हे जुने बटूक हनुमानाचे मंदिर आहे. त्यात असलेली हनुमान मूर्ती कधीपासून आहे याबाबत कोणालाच कल्पना नाही. तपोवन भागातील हनुमान मूर्तीला बटुक हनुमान असं नाव श्यामसुंदर महाराज यांनी दिलं. त्यांच्या मुखातूननामस्मरण करताना  बटुक हनुमान हे नाव निघाले होते. तेव्हा पासून या हनुमानाला बटुक असे नाव पडले आहे.

5/7
सोन्या मारोती: नाशिकच्या सराफ बाजारातील श्री सोन्या मारोतीचे मंदिरदेखील पुरातन आहे. सराफ बाजारातील मंदिर आणि तेही सोन्याचा मुलामा दिलेले. त्यामुळे सोन्यासारख्या चकाकणाऱ्या मंदिरातील या मूर्तीचा सोन्या मारोती नावाने परिचय आहे. मंदिराचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला. त्यावेळी अहमदाबाद आणि सुरत येथून कारागीर आले होते. त्यावेळीच उंचावर असलेल्या मंदिराला काहीसे खाली आणण्यात आले.

6/7
काट्या मारुती: नाशिक मधील आडगाव नाक्याचा काट्या मारुती साडेअकरा फूट उंचीचा आहे. हा मारुती लंबे हनुमान म्हणून प्रसिद्ध आहे. जुना आडगाव नाका यइथं असलेलं हे हनुमान मंदिर अत्यंत पुरातन आहे. या मूर्तीबद्दल अशी आख्यायिका आहे की द्वापारयुगात 12 वर्षांच्या वनवासात असलेल्या पांडवांना घनदाट जंगलात बाभळीच्या एका झाडाखाली ही मूर्ती मटीत सापडली होती.

7/7
पनवती हनुमान: पनवती हा शब्द कुठलीही गोष्ट अशुभ आणि गमवणे या अर्थानं वापरलं जातो. पूर्वी पनवती नावाची एक राक्षसीण होती. तिच्यामुळेच ही संज्ञा रूढ झाली. या राक्षसिणीचा वध हनुमानाने केला, अशी आख्यायिका सांगितली जाते. त्यामुळे गाडगे महाराज धर्मशाळेच्या खाली पनवती हनुमानाचे  हे मंदिर आहे. यात हनुमान मूर्तीच्या पायाखाली पनवती राक्षसीण दाखवली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement