Hanuman Jayanti 2025 : स्वप्नात जावून दिला दृष्टांत, नवसाला पावणारा म्हणून प्रसिद्ध, चांगापूरच्या हनुमान मंदिराची आख्यायिका
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
अमरावतीवरून काही अंतरावर चांगापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली जागृत हनुमानाचे मंदिर आहे. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात पुरातन विहीर सुद्धा आहे. त्या विहिरीचे विशेष महत्त्व आहे, असे तेथील नागरिक सांगतात.
अमरावतीवरून काही अंतरावर चांगापूर हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्या ठिकाणी कडुलिंबाच्या झाडाखाली जागृत हनुमानाचे मंदिर आहे. त्याचबरोबर मंदिराच्या परिसरात पुरातन विहीर सुद्धा आहे. त्या विहिरीचे विशेष महत्त्व आहे, असे तेथील नागरिक सांगतात. या मंदिरातील दिनक्रम कधीही चुकत नाही. दररोज सकाळी 4 वाजता या ठिकाणी हनुमानाचा अभिषेक करून आरती केली जाते. गेले कित्येक वर्ष हा नित्यक्रम या ठिकाणी सुरू आहे, असे मंदिराचे अध्यक्ष श्यामरावजी लढ्ढा यांनी सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
त्यावेळी 1935 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. तेव्हा छोटेसे मंदिर होते. आता त्यात वृद्धी होऊन हनुमंताचे मंदिर मोठे करण्यात आहे. तेव्हापासून पंचक्रोशीतील भक्तगण या ठिकाणी दर शनिवारी दर्शनाला येतात. शनिवारी या परिसरात खूप गर्दी असते. नवसाला पावणारे हनुमंत म्हणून येथील ख्याती आहे, असे त्यांनी सांगितले.
advertisement
याच मंदिराच्या परिसरात एक पुरातन विहीर आहे. या विहिरीला बघून जणू काही राजवाडा असल्याचा भास होतो. विहिरीच्या अवतीभवती सुंदर बांधकाम केले आहे. त्याच ठिकाणी भगवान शंकराचे मंदिर सुद्धा आहे. या विहिरीला 108 प्रदक्षिणा मारल्यास मनातील इच्छा पूर्ण होते, याची प्रचिती अनेकांना आली होती. आजही अनेक लोक हातात नारळ घेऊन विहिरीला प्रदक्षिणा मारून तो नारळ हनुमंताला अर्पण करतात.
advertisement
विहिरीच्या आत गुफा आहे आणि त्या गुफेच्या आत सुद्धा मंदिर आहे. ते आता बंद करण्यात आले आहे. या मंदिराचे विशेष म्हणजे, श्री वल्लभ बद्रीनाथ लढ्ढा यांनी गोरगरीब लोकांचा विचार करून या ठिकाणी बांधकाम केले आहे. आजूबाजूच्या गावातील गरिबांचे लग्न या मंदिरामध्ये करता येईल अशी जागा त्या ठिकाणी आहे. अतिशय कमी दरात लग्न सोहळ्यासाठी परिसर उपलब्ध करून दिला जातो.
advertisement
अनेक भाविक महाप्रसाद सुद्धा या ठिकाणी येऊन करतात. महाप्रसादासाठी मोफत भांडे सुद्धा या येथे उपलब्ध करून दिले जातात. मंदिराचा दिनक्रम कधीही चुकत नाही. वर्षाचे 365 दिवस हा दिनक्रम येथील पुजारी नित्य नियमाने पाळतात, असे लढ्ढाजी सांगतात.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)