Mahashivratri: नेपाळच्या प्रसिद्ध मंदिरासारखंच शिवमंदिर सांगलीत, तुम्ही पाहिलंय का?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Mahashivratri: सांगलीतील शिवमंदिराची तुलना नेपाळ आणि वाराणसी येथील पशुपतीनाथ मंदिराशी केली जाते. महाशिवरात्रीला इथं मोठी गर्दी असते.
महाशिवरात्रीनिमित्त देशभरातील शिवमंदिरे भाविकांनी फुलून जातात. सांगली जिल्ह्यात पशुपतीनाथाचं पुरातन मंदिर आहे. या मंदिराची तुलना थेट नेपाळ आणि वाराणसीच्या मंदिरांशी केली जाते. या मंदिराला धार्मिक आणि ऐतिहासिक वारसा आहे. शेकडो वर्षांपूर्वीच्या या गुढरम्य मंदिराबद्दल वेगवेगळ्या काळातील अनेक अख्यायिका सांगितल्या जातात.
advertisement
advertisement
advertisement
श्री पशुपती मंदिराच्या सांस्कृतिक वारशाविषयी रेठरेहरणाक्ष गावचे रहिवासी मोहन जाधव यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये. मंदिराच्या गाभाऱ्याच्या दगडी प्रवेशद्वारावर कोरीव नक्षीकाम आहे. तसेच प्रवेशद्वाराच्या उंबऱ्याला खाली आणि वरती कीर्तीमुख दिसते. दोन्ही बाजूस शस्त्रधारी दोन द्वारपाल आणि दोन हत्तींची शिल्पे आहेत. सभा मंडपामध्ये एका बाजूस श्री गणेशाची मूर्ती तर दुसऱ्या बाजूस देवीची मूर्ती आहे.
advertisement
advertisement
advertisement
श्री पशुपती मंदिराच्या बाहेरील बाजूस दगडी भिंतींवरती शरभशिल्पे आहेत. तसेच गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या नक्षीकामामध्ये दोन्ही बाजूस ऋषीमुनींचे शिल्प आहे. या शिल्पामध्ये ऋषीमुनींनी दोन्ही बाजूस केस सांभार केला आहे. केशरचनेच्या या प्रकारावरून ते पराशर ऋषींचे शिल्प असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
advertisement
रेठरेहरणाक्ष येथील कृष्णेचा डोह रमणीय आहे. कृष्णा नदीच्या रम्य काठावर वसलेले हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि भक्तांसाठी एक खास आकर्षण आहे. विशेष म्हणजे इथून वाहणारी कृष्णा नदी ही दक्षिण वाहिनी आहे. रेठरेहरणाक्ष आणि बिचुद गावाच्या शेत जमिनीमध्ये शांत निसर्गाच्या कुशीत वसलेल्या पशुपती मंदिराचे सौंदर्य पावसाळ्यामध्ये अधिक खुलते.
advertisement
रेठरेहरणाक्ष आणि पंचक्रोशीतील भक्तांसह मंदिरा विषयी माहिती असलेले कित्येक शिवभक्तांचे श्रद्धास्थान आहे. श्रावण महिन्यामध्ये तसेच महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी असते. रेठरे हरणाक्ष गावचे ग्रामस्थ श्री पशुपती मंदिरामध्ये पारायण सोहळा साजरा करतात. महाशिवरात्री दिवशी पारायण सप्ताहाची सांगता करून यात्रा करतात.