Vinayak Chaturthi: वर्षातील शेवटची विनायक चतुर्थी आज; या शुभ मुहूर्तावर करा विधीपूर्वक गणेश पूजा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Vinayak Chaturthi 2023: प्रत्येक महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला विनायक चतुर्थी व्रत केलं जातं. सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असून या महिन्याची विनायक चतुर्थी आज 16 डिसेंबर रोजी आहे. या वर्षातील ही शेवटची विनायक चतुर्थी असेल. चतुर्थी तिथी ही गणपतीला समर्पित आहे. या दिवशी गौरीपुत्र गणेशाची विधीपूर्वक पूजा केली जाते. श्री गणेश हे सर्व देवतांमध्ये प्रथम पूजनीय असून ते शुभ-लाभाचे प्रतीकही आहेत. विनायक चतुर्थीला गणपती बाप्पाची पूजा करून व्रत केल्यास ज्ञान आणि समृद्धी प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. वर्षातील शेवटच्या विनायक चतुर्थीच्या पूजा पद्धती आणि शुभ मुहूर्ताबद्दल जाणून घेऊया.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement