Tulsi Puja: तुळशीची अशी पूजा करणं व्यर्थ! नियमित जल अर्पण करूनही मिळत नाही फळ
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Tulsi Puja Tips Marathi : भारतीय संस्कृतीत तुळशीच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. दैवी गुणधर्मांसोबतच ही वनस्पती औषधी गुणांनीही परिपूर्ण आहे. त्यात अनेक अलौकिक आयुर्वेदिक शक्ती आहेत. हिंदू धर्म मानणारे अनेक लोक आपल्या घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावतात, पण तुळशीचे काही नियम अनेकांना माहीत नाहीत.
advertisement
शिवलिंग - तुळशीच्या जवळ भगवान शिव, गणेशाची मूर्ती किंवा शिवपरिवारातील कोणतीही गोष्ट असू नये, असे वास्तुशास्त्रात सांगितले आहे. तुळशीच्या जवळ यापैकी काही आल्यास त्याचा नकारात्म प्रभाव दिसू लागतो. तुळस आणि महादेवाची एकत्रित पूजा होऊ शकत नाही. तुळस शंकराच्या पूजेतही वापरू नये, त्यामुळे भाविकांना अनेक प्रकारचे दुःख सहन करावे लागते.
advertisement
advertisement
advertisement
गच्चीवर तुळस लावू नये - घराच्या छतावर तुळशीचे रोप कधीही लावू नये. असे केल्याने झाडाची काळजी घेतली जात नाही आणि तुळशीच्या रोपाची सकारात्मक ऊर्जाही संपते, असे मानले जाते. याशिवाय घराच्या छतावर तुळस लावल्यानं तीव्र ऊन, वादळ, पाऊस आणि थंडीमुळे रोप अकाली सुकते. तुळशीचे रोप अकाली सुकणे शुभ मानले जात नाही. (सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)