Dream11 ची दुसरी बाजू समोर, शेतकऱ्याच्या पोराने सगळं खरं खरं सांगितलं!
- Published by:sachin Salve
Last Updated:
सध्या आयपीएलचा सिझनमध्ये अनेक फॅन्टसी एपवर आपली टीम तयार करून करोडपती होण्याचं स्वप्न अनेक जण पाहत आहे.
सध्या आयपीएलचा हंगाम सुरू आहे. अत्यंत अटीतटीचे सामने सुरू आहे. तर दुसरीकडे फॅन्टसी एपवरून दररोज अनेक जण करोडपती होत आहे. काही एपवर १ कोटी तर काही ठिकाणी विनिंग प्राईज मनीही तब्बल ४ कोटी आणि आलिशान कार असं बक्षीसही दिलं जात आहे. पण साहजिक अशा एपवरून टीम लावून कुणी करोडपती होतं का असा बेसिक प्रश्न उपस्थितीत होतो. पण उत्तर प्रदेशमधील एका तरुणाने याबद्दल सगळं काही सांगितलं आहे.
advertisement
कुणाचं नशीब कधी बदलेलं हे कुणीचं सांगू शकत नाही. सध्या आयपीएलचा सिझनमध्ये अनेक फॅन्टसी एपवर आपली टीम तयार करून करोडपती होण्याचं स्वप्न अनेक जण पाहत आहे. पण यात सगळ्यांना यश येईल असं नाही. बोटावर मोजणारी अशीच नशीबवान माणसं इथं करोडपती झाल्याचं समोर आलं आहे. उत्तर प्रदेशमधील कौशांबी इथं घासी गावात राहणारा एक शेतकऱ्याला मुलगा ड्रीम ११ एपवर करोडपती झाला आहे.
advertisement
advertisement
advertisement
मंगल सरोजने मार्च महिन्यापासून ड्रीम ११ खेळ खेळायला सुरुवात केली. त्याने आतापर्यंत ७७ वेळा ड्रीम ११ खेळावर पैसे लावले. २९ एप्रिल रोजी, ७८ व्या वेळी, त्याने ३९ रुपये गुंतवून ड्रीम ११ वर खेळ खेळला. विशेष म्हणजे त्याच्या बँक खात्यात तेवढेच पैसे शिल्लक राहिले होते. गेल्या काही दिवसांपासून तो ड्रीम ११ वर एक कोटी रुपये जिंकण्याचे तो स्वप्न पाहत होता. दरम्यान, मंगल सरोजचे स्वप्न सत्यात उतरले.
advertisement
advertisement
मार्चपासून सतत ४९ रुपये गुंतवून ड्रीम ११ वर खेळ खेळत होतो. प्रत्येक सामना हरलो. पण ३० एप्रिल रोजी जेव्हा चेन्नई आणि पंजाब यांच्यात सामना सुरू होता, तेव्हा खात्यात फक्त ३९ रुपये होते. मी हार मानली नाही, करोडपती होण्यासाठी मी रात्रंदिवस विचार करायचो. अखेर मला यश मिळाले. चेन्नई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात ३९ रुपये गुंतवून ४ कोटी रुपये जिंकले. जिंकलेले पैसे एखाद्या चांगल्या व्यवसायात गुंतवणूक करण्याचा विचार आहे, जेणेकरून भविष्य सुरक्षित होईल, असे मंगल प्रसाद सरोजने सांगितले.
advertisement
मंगल सरोजने ४ कोटी रुपये जिंकले असले तरी त्याच्या हातात पूर्ण रक्कम येणार नाही. Dream11 वर जिंकलेल्या रक्कमेवर आयकर अधिनियम, 1961 कलम 56(2)(ib) नुसार अतिरिक्त कमाईनुसार टॅक्स लागेल. ४ कोटी जिंकलेली रक्कम यावर ३० टक्के कर लागेल. सरचार्ज आणि सेस मिळून एकूण ३९ टक्के इतका टॅक्स लागतो. Dream11 कडून टीडीएस कपात 1.56 कोटी वजा होतील. मंगलच्या हातात 2.44 कोटी रुपये येतील. ड्रीम ११ वर १० हजारांपेक्षा जास्त जिंकले तर टीडीएल देणे बंधनकारक आहे. त्यामुळे मंगलसला आधी टॅक्स भरावा लागेल. इन्कम टॅक्स रिटर्न फाइल करत असताना ४ कोटी रुपये रक्कम दाखवावी लागेल.
Form 26AS मध्ये टीडीएस दाखवावा लागेल की जेणेकरून Dream11 कडून टीडीएस कपात केलं आणि टॅक्स क्रेडिट स्टेटमेंटमध्ये कोणताही फरक नाही हे दाखवावं लागेल.
Form 26AS मध्ये टीडीएस दाखवावा लागेल की जेणेकरून Dream11 कडून टीडीएस कपात केलं आणि टॅक्स क्रेडिट स्टेटमेंटमध्ये कोणताही फरक नाही हे दाखवावं लागेल.