Champions Trophy Final: चॅम्पियन्स ट्रॉफीवर सर्वात बोल्ड भविष्यवाणी, फायनल मॅच भारत १ धावाने जिंकणार, पण कोणाविरुद्ध?
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Champions Trophy Final Prediction : ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलियात यांच्यात होईल आणि टीम इंडिया ही मॅच फक्त एका धावेने जिंकून विजेतेपद पटकावेल. तसेच, रोहित शर्मा हा स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा फलंदाज ठरेल,अशी भविष्यवाणी ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकेल क्लार्कने केली आहे
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनल लढतीतील संघ निश्चित झाले आहेत. अ गटातून न्यूझीलंड आणि भारत तर ब गटातून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ सेमीमध्ये पोहोचले आहेत. ब गटात आफ्रिका अव्वल तर ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानी आहे. अ गटातील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एक लढत शिल्लक आहे त्यानंतर त्यांचे स्थान निश्चित होईल. भारत अव्वल स्थानी राहिला तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि दुसऱ्या क्रमांकावर राहिला तर द.आफ्रिकेविरुद्ध लढत होईल. स्पर्धेत चार संघांची स्थिती अशी असताना ऑस्ट्रेलियाच्या एका दिग्गज माजी कर्णधाराने स्पर्धेच्या विजेत्या संघाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
advertisement
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अंतिम सामना होणार?: ऑस्ट्रेलियाचे माजी कर्णधार मायकेल क्लार्कने ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 विषयी मोठे भाकीत केले आहे. त्यांच्या मते, फायनल मॅच भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होईल आणि भारत फक्त एक धावने विजयी ठरेल. भारताला सध्या जगातील सर्वोत्तम वनडे संघ असल्याचे तो म्हणाला. मला वाटते की चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात सामना होईल. मी ऑस्ट्रेलियाला जिंकताना पाहू इच्छितो, पण मला वाटते की भारत हा सामना जिंकेल आणि फक्त एका धावेच्या फरकाने,असे क्लार्कने सांगितले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
रोहित शर्मा ठरेल स्पर्धेतील सर्वोत्तम फलंदाज?: मायकेल क्लार्क यांनी भारतीय कर्णधार रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मधील सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल, असे भाकीत केले आहे. रोहित पुन्हा फॉर्मात आला आहे, याबाबत कोणतीही शंका नाही. तो आक्रमक खेळपट्टीवरही सहज खेळू शकतो आणि पॉवरप्लेचा पुरेपूर वापर करतो, असे क्लार्कने सांगितले. मला वाटते की भारत ही स्पर्धा जिंकेल आणि रोहित शर्मा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल. त्याने कटकमध्ये केलेले शतक हे याचे मोठे उदाहरण आहे.
advertisement
भारत वर्ल्ड कपच्या पराभवाचा बदला घेईल का?: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील शेवटचा मोठा सामना ODI वर्ल्ड कप 2023 फायनलमध्ये झाला होता. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत सहावा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. मायकेल क्लार्कच्या मते यंदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत वर्चस्व गाजवेल आणि अंतिम फेरीत थरारक विजय मिळवेल. त्याच्या मते टीम इंडिया फायनल मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा एका धावेच्या पराभव करेल.
advertisement