RCB vs PBKS : प्रीती झिंटा विरुद्ध विराट कोहली! कोण किती 'मालदार'? IPL मधून किती कमावतात?

Last Updated:
IPL 2025 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात चुरस आहे. या 'हाय-व्होल्टेज' सामन्यादरम्यान प्रीती झिंटा आणि विराट कोहली यांच्या संपत्तीची तुलना चर्चेत आहे.
1/10
मुंबई: आयपीएल २०२५ चा थरार आता निर्णायक वळणावर येऊन थांबला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि पंजाब किंग्स यांच्यातील अंतिम सामना कधी एकदा संपतोय असं चाहत्यांना झालंय. एका बाजूला, प्रीती झिंटाची टीम पंजाब, तर दुसरीकडे तब्बल १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विराट कोहलीने आपल्या टीमला विजेतेपद मिळवून द्यावं, अशी चाहत्यांची प्रार्थना! या 'हाय-व्होल्टेज' सामन्याआधी, बॉलीवूडची 'डिंपल गर्ल' आणि क्रिकेटचा 'किंग' यांच्या कमाईचा रंजक हिशोब समोर आला आहे.

advertisement
2/10
गेली काही वर्षे बॉलीवूडपासून दूर असली तरी, प्रीती झिंटा सध्या पुन्हा चर्चेत आहे. लवकरच ती आमिर खान प्रॉडक्शनच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटात दिसणार आहे. पण सध्या खरी चर्चा आहे ती तिच्या मालकीच्या पंजाब किंग्स संघाची, ज्याने आयपीएल २०२५ च्या फायनलमध्ये धडक मारली आहे!

3/10
दुसरीकडे, गेल्या दीड दशकाहून अधिक काळ क्रिकेटच्या मैदानावर राज्य करणारा विराट कोहली आहे, जो आरसीबीचा कणा आहे. प्रीती झिंटा, एक बॉलीवूडची मोठी हस्ती असून क्रिकेटशी जोडलेली आहे, तर विराट कोहली, क्रिकेटचा बादशाह असून त्याची पत्नी अनुष्का शर्मामुळे बॉलीवूडशी जोडला गेला आहे. या दोघांमध्ये इतक्या गोष्टी समान असताना, आता आपण पाहूया की आयपीएलमधून कोण किती कमाई करतो आणि दोघांची एकूण संपत्ती किती आहे.

4/10
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या रिपोर्टनुसार, प्रीती झिंटाची एकूण संपत्ती सुमारे १८३ कोटी रुपये आहे. तिने ही कमाई अभिनय, ब्रँड एंडोर्समेंट, व्यावसायिक व्यवहार आणि आयपीएलमधील गुंतवणुकीतून केली आहे.

5/10
तर, दुसरीकडे विराट कोहलीची एकूण संपत्ती तब्बल १०५० कोटी रुपयांच्या घरात आहे! ब्रँड एंडोर्समेंट, आयपीएलमधील पगार आणि क्रिकेटमधील इतर स्रोतांतून त्याने ही अवाढव्य संपत्ती जमवली आहे.

6/10
प्रीती झिंटा आपल्या 'पंजाब किंग्स' संघाची मालकी करण पॉल, नेस वाडिया आणि मोहित बर्मन यांच्यासोबत सांभाळते. 'इकॉनॉमिक टाइम्स'च्या मते, सध्या या संघाचं मूल्य सुमारे १ बिलियन डॉलर म्हणजेच अंदाजे ८५५९ कोटी रुपये झालं आहे.

7/10
संघाची कमाई स्पॉन्सरशिप, सामन्यांचे प्रसारण हक्क आणि तिकीट विक्रीतून होते. बीसीसीआयही (BCCI) आयपीएल संघांच्या मालकांना कमाईचा एक मोठा हिस्सा देते. या संघात प्रीती झिंटाची २३ टक्के हिस्सेदारी आहे, म्हणजेच तिला कमाईचा तितका टक्के हिस्सा मिळतो.

8/10
विराट कोहलीबद्दल बोलायचं झाल्यास, तो रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचा सर्वात महागडा खेळाडू आहे, ज्याला वार्षिक १५ कोटी रुपये दिले जातात. याशिवाय, प्रत्येक वनडे सामन्यासाठी त्याला ६ लाख रुपये मिळतात. त्याने टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे त्या प्रकारातील त्याची कमाई थांबली आहे.

9/10
क्रिकेटव्यतिरिक्त, विराट आपले रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायांमध्ये केलेल्या गुंतवणुकीतूनही मोठी कमाई करतो. ब्रँड एंडोर्समेंटमधूनही तो कोट्यवधी कमावतो. फक्त 'एमआरएफ टायर्स'सोबतचा त्याचा करार १०० कोटी रुपयांचा आहे.

10/10
आयपीएलच्या या महाअंतिम सामन्यात केवळ मैदानातील चुरसच नाही, तर पडद्यामागे या दोन मोठ्या सेलिब्रिटींच्या आर्थिक ताकदीचीही चर्चा सुरू आहे. आता ही 'कोट्यवधींची लढत' कोण जिंकतं, हे पाहणं रंजक ठरेल!

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement