Success Story: नोकरीतून मिळणार नाही एवढं लिंबानं दिलं, लेमन किंग कमवतोय सॉफ्टवेअर इंजिनियरपेक्षा जास्त

Last Updated:
शिक्षण बीकॉम, आजमावला मार्बल व्यवसाय, डाळींब अन् पेरु सोडून लिंबाची केली लागवड, 2 एकर बागेतून 12 लाखांचा नफा, लेमन किंग अभिषेक यांची संघर्षगाथा
1/7
शेतीला फायदेशीर व्यवसाय बनवण्यात देशातील तरुण शेतकरी मोलाची भूमिका बजावत आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे राजस्थानमधील भीलवाडा जिल्ह्यातील संग्रामगढ गावातील अभिषेक जैन. बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतलेल्या अभिषेक यांनी लिंबूची सेंद्रिय शेती करून भरघोस कमाईचा सुरू केली. त्यांचे म्हणणे आहे की, ते एका लिंबूच्या झाडापासून वर्षाला १५० किलोहून अधिक उत्पादन घेतात, तर सामान्यतः इतर शेतकरी एका झाडाकडून ८० किलोपर्यंतच उत्पादन मिळवू शकतात.

advertisement
2/7
अभिषेक जैन हे मूळात चार्टर्ड अकाउंटंट व्हायचं होतं, त्यासाठी त्यांनी सीए फाउंडेशनची परीक्षाही उत्तीर्ण केली होती. त्यानंतर त्यांनी काही काळ मार्बलच्या व्यवसायातही नशीब आजमावले. मात्र, त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर परिस्थिती बदलली. वडिलांच्या पश्चात शेतीची संपूर्ण जबाबदारी अभिषेक यांच्यावर आली.

3/7
२००७ मध्ये त्यांनी पूर्णपणे शेतीकडे लक्ष केंद्रित केले. त्यांच्या वडिलांनी दोन एकरमध्ये लिंबूची बाग लावली होती, ज्यातून त्यांना वर्षाला सुमारे ८ ते १० लाख रुपयांचे उत्पन्न मिळत होते, तर यासाठी २ ते २.५ लाख रुपये खर्च येत होता. वडिलांची ही यशस्वी शेती पाहून अभिषेक यांनी यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला.

4/7
अभिषेक जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशी कागदी लिंबू या जातीची लागवड करतात. या जातीच्या लिंबाचा आकार मोठा असतो, त्याची साल पातळ असते आणि त्यातून रसही अधिक मिळतो. त्यांनी अजमेरजवळच्या एका नर्सरीतून या जातीची रोपे मागवली आणि १८x१८ फूट अंतरावर त्यांची लागवड केली. अशाप्रकारे, प्रति एकरमध्ये १४४ रोपे लावली. रोपांची लागवड करताना त्यांनी रासायनिक खतांऐवजी शेणखत आणि इतर सेंद्रिय खतांचे मिश्रण मातीमध्ये टाकले.

5/7
लिंबूची रोपे पहिल्या चांगल्या पावसानंतर, म्हणजेच जुलै-ऑगस्टमध्ये लावली जातात. साधारणतः तीन वर्षांनी या झाडांना लिंबू यायला सुरुवात होते. तिसऱ्या वर्षी २५ ते ३० किलो, चौथ्या वर्षी ५० किलो आणि पाचव्या वर्षापासून प्रति झाड ८० ते १५० किलो लिंबूचे उत्पादन मिळते.

6/7
अभिषेक वर्षातून तीन वेळा उत्पादन घेतात, उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ते लिंबूचे उत्पादन घेणे टाळतात. यामागील कारण स्पष्ट करताना ते सांगतात की, एकतर राजस्थानमध्ये पाण्याची कमतरता असते आणि दुसरे म्हणजे उन्हाळ्यात उत्पादन कमी मिळते, ज्यामुळे वाहतूक आणि इतर खर्च जास्त होतो. अशा प्रकारे, त्यांनी उत्पादन व्यवस्थापनाची योग्य रणनीती आखली आहे.

7/7
वडिलांच्या दोन एकर बागेतून चांगले उत्पन्न घेतल्यानंतर, अभिषेक यांनी आता आणखी दोन एकरमध्ये लिंबूची बाग लावली आहे, ज्यातून त्यांना यावर्षी उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे. आपले शिक्षण आणि व्यवसाय कौशल्य शेतीत वापरून अभिषेक जैन यांनी सिद्ध केले आहे की, तरुण पिढीने आधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य नियोजन केल्यास शेती हा सर्वात फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement