Success story: दिसत नाही पण नेम आहे भारी! नेमबाजीत तरबेज असलेले भारताचे पहिले दृष्टीहीन ले. कर्नल द्वारकेश

Last Updated:
लेफ्टनंट कर्नल द्वारकेश यांनी अंधत्वावर मात करत भारतीय सैन्यदलात नवा अध्याय लिहिला आणि राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार मिळवला.
1/7
एका अपघाताने दृष्टी गेली मात्र मनातली जिद्द कायम होती. त्याच जिद्दीच्या जोरावर त्यांनी नव्या आयुष्याची सुरुवात केली. अशक्य ते शक्य करुन दाखवलं आणि आज त्यांना भारतीय सैन्यदलातून राष्ट्रपती द्रौपदी मूर्म यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

advertisement
2/7
२०१४ मध्ये बास्केटबॉलचा सामना पाहिला तीच त्यांची शेवटची आठवण, ही लेफ्टनंट कर्नल सी. द्वारकेश यांच्या डोळ्यासमोरची शेवटची प्रतिमा ठरली. एका अपघाताने त्यांची दृष्टी पूर्णपणे हिरावून घेतली. त्यानंतरचे आठ महिने त्यांनी रुग्णालयात केवळ उपचारच घेतले नाहीत, तर दृष्टी नसलेल्या नव्या आयुष्याची सवय लावून घेतली. पण त्यांच्या मनात मात्र एका नव्या, उज्ज्वल भविष्याच्या शक्यतांनी जन्म घेतला होता. अपंगत्व त्यांच्या आयुष्यातील 'शेवट' नव्हता, तर ती एक नवी सुरुवात होती.

3/7
बुधवारी, त्यांच्या याच अदम्य धैर्यासाठी आणि आत्मविश्वासासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३६ वर्षीय द्वारकेश यांना दिव्यांगांसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. अपंगत्वही ज्यांच्या लष्करी कारकिर्दीला पूर्णविराम देऊ शकले नाही, अशा या जिद्दी अधिकाऱ्याला मिळालेला हा सन्मान आहे. आज त्यांच्या यशाच्या यादीत पॅरा शूटिंगमधील जागतिक विक्रमाची भर पडली आहे.

4/7
लेफ्टनंट कर्नल द्वारकेश यांनी भारतीय सशस्त्र दलात एक नवा अध्याय लिहिला आहे. पूर्णपणे अंधत्व आले असतानाही ते सक्रिय सेवेत कार्यरत असणारे पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांनी दिल्लीतून बोलताना सांगितले,
लेफ्टनंट कर्नल द्वारकेश यांनी भारतीय सशस्त्र दलात एक नवा अध्याय लिहिला आहे. पूर्णपणे अंधत्व आले असतानाही ते सक्रिय सेवेत कार्यरत असणारे पहिले अधिकारी ठरले आहेत. त्यांनी दिल्लीतून बोलताना सांगितले, "एक लष्करी अधिकारी म्हणून मी धैर्य आणि चिकाटीचे प्रशिक्षण घेतले होते, पण अंधत्वाची तयारी करणे शक्य नव्हते. मी शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने या अडथळ्यावर मात केली आणि स्पर्धा परीक्षाही उत्तीर्ण केल्या. मी माझ्या अपंगत्वाला माझी शक्ती बनवले आणि दृष्टी असलेल्या व्यक्तींप्रमाणेच जगण्याचा मार्ग शोधला."
advertisement
5/7
लेफ्टनंट कर्नल द्वारकेश आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सहाय्यक तंत्रज्ञानाच्या मदतीने आपले काम आपल्या सहकाऱ्यांइतक्याच अचूकतेने पूर्ण करतात. क्रीडा क्षेत्रात त्यांनी कमाल केली आहे. ते जलतरण आणि नेमबाजीचे राष्ट्रीय विजेते आहेत आणि १० मीटर एअर रायफल स्पर्धेत त्यांची जागतिक क्रमवारी तिसरी आहे.

6/7
सर्वात मोठा पराक्रम म्हणजे, त्यांनी याच वर्षी ऑक्टोबरमध्ये यूएई येथे झालेल्या विश्वचषक स्पर्धेत ६२४.६ गुणांचा जागतिक विक्रम नोंदवला आहे. ते सध्या भारतीय पॅरा नेमबाजी संघासोबत सराव करतात. २००९ मध्ये लष्करात रुजू झालेले द्वारकेश या राष्ट्रीय पुरस्काराला त्यांच्या जीवनातील Full-circle moment असल्याचं मानतात.

7/7
मला आठवतंय, १६ वर्षांपूर्वी मला राष्ट्रपतींनीच कमिशन दिले होते आणि आज, ज्या गोष्टीमुळे माझे आयुष्य बदलले, त्याच गोष्टीसाठी पुन्हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणे, ही खूप मोठी गोष्ट आहे.
मला आठवतंय, १६ वर्षांपूर्वी मला राष्ट्रपतींनीच कमिशन दिले होते आणि आज, ज्या गोष्टीमुळे माझे आयुष्य बदलले, त्याच गोष्टीसाठी पुन्हा राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणे, ही खूप मोठी गोष्ट आहे." तामिळनाडूचे रहिवासी असलेले हे अधिकारी व्यवस्थापन, मानव संसाधन, कामगार कायदा आणि क्रीडा संशोधन यांसारख्या विषयात यूजीसी नेट देखील पात्र झाले आहेत.
advertisement
Eknath Shinde Uddhav Thackeray: कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, मातोश्रीवर 'घरवापसी'च्या हालचाली!
कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार
  • कोकणातून सुरुवात, राज्यातही सूर जुळणार? शिंदे गटात अस्वस्थता, 'घरवापसी' होणार

View All
advertisement