Success Story: कधीकाळी पेपर विकणारा आज 400 लग्झरी कारचा मालक, कोण हा श्रीमंत हेअर ड्रेसर?

Last Updated:
रमेश बाबू यांनी बेंगळूरुतील गरीब कुटुंबातून संघर्ष करत ४०० गाड्यांचा ताफा उभा केला, तरीही ते आजही सलूनमध्ये केस कापतात. त्यांची कहाणी तरुणांसाठी प्रेरणादायक आहे.
1/7
तुमचा विश्वास बसणार नाही, पण एकेकाळी एका वेळेच्या भाकरीसाठी संघर्ष करणाऱ्या एका व्यक्तीकडे आज रोल्स-रॉयस, बीएमडब्ल्यू आणि जग्वार सारख्या १२० लक्झरी गाड्यांसह एकूण ४०० गाड्यांचा ताफा आहे. हे ऐकायला जरी वेगळं वाटत असलं तरी स्वप्न नाही तर सत्य आहे. भारतातील सर्वात श्रीमंत न्हावी (हेअर ड्रेसर) असलेल्या रमेश बाबू यांची.

advertisement
2/7
करोडोंचे मालक असूनही, रमेश बाबू यांनी आजही आपला सलूनचा व्यवसाय सोडलेला नाही; ते आजही प्रेमाने लोकांचे केस कापताना दिसतात. रमेश बाबू यांचा संघर्ष लहानपणापासूनच सुरू झाला. त्यांचा जन्म बेंगळूरु येथील एका गरीब कुटुंबात झाला. रमेश बाबू जेव्हा अवघे सात वर्षांचे होते, तेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

3/7
वडिलांच्या अचानक जाण्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे आर्थिक संकट कोसळले. घरात कमाईचे दुसरे कोणतेच साधन नव्हते. तीन मुलांचे पोट भरण्यासाठी रमेश बाबू यांच्या आईला दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी अन् जेवणाचं काम करावं लागायचं. इतकी बिकट परिस्थिती होती की, अनेकदा त्यांच्या घरात दिवसातून केवळ एकदाच जेवण बनत असे.

4/7
या कठीण काळात रमेश बाबू यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी सकाळी लवकर उठून घरोघरी दूध वाटप करणे आणि रस्त्यावर वर्तमानपत्रे विकणे सुरू केले. आईला घरखर्चात मदत करत असतानाही, त्यांनी आपले शिक्षण सुरू ठेवले. वडिलांनी कुटुंबासाठी एक छोटेसे सलून दुकान मागे ठेवले होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांचे काका हे दुकान चालवत होते आणि रोज फक्त पाच रुपये घरी पाठवत असत.

5/7
काही वर्षांनंतर जेव्हा काकांनी पैसे पाठवणे बंद केले, तेव्हा रमेश बाबू यांनी ते सलून दुकान काकांकडून परत घेतले. सुरुवातीला रमेश बाबू यांना केस कापता येत नव्हते. पण एका दिवशी एका ग्राहकाने हट्ट केल्यामुळे त्यांनी त्याचे केस कापले आणि याच प्रसंगातून त्यांना आपल्या कलेची जाणीव झाली. मग त्यांनी मन लावून सलूनच्या कामाला सुरुवात केली.

6/7
कालांतराने, त्यांनी आपल्या स्वप्नांना नवा मार्ग दिला आणि कार रेंटल व्यवसाय सुरू केला. १९९३ मध्ये त्यांनी हप्त्यांवर एक ओम्नी व्हॅन घेतली. इथूनच त्यांच्या यशस्वी प्रवासाची खरी सुरुवात झाली. कार भाड्याने देण्याच्या व्यवसायात त्यांना अभूतपूर्व यश मिळाले.

7/7
ओम्नीपासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास आज ४०० गाड्यांच्या भव्य कलेक्शनपर्यंत पोहोचला आहे. यामध्ये १२० लक्झरी गाड्या आहेत, ज्या अनेक मोठे उद्योजक आणि चित्रपट तारे त्यांच्याकडून भाड्याने घेतात. आज अब्जाधीश असूनही, रमेश बाबू यांनी आपल्या सलूनमध्ये केस कापणे सोडलेले नाही. त्यांचा हा प्रवास दाखवतो की, परिस्थिती कितीही बिकट असली तरी, कठोर परिश्रम, नम्रता आणि आपल्या मूळ कामावरचे प्रेम तुम्हाला यशाच्या शिखरावर पोहोचवू शकते. त्यांची ही गोष्ट अनेक तरुणांसाठी मोठी प्रेरणा ठरली आहे.

Jitendra Awhad Gopichand Padalkar Clash: विधानभवनातील हाणामारी पडणार महागात, तुरुंगवासाची शिफारस? चौकशी समितीच्या अहवालात मोठा खुलासा
विधानभवनातील हाणामारी पडणार महागात, तुरुंगवासाची शिफारस? चौकशी समितीच्या अहवालात
  • विधानभवनातील हाणामारी पडणार महागात, तुरुंगवासाची शिफारस? चौकशी समितीच्या अहवालात

View All
advertisement