अख्खं कुटुंब संपलं, कोरोनानं व्यवसाय बंद झाला, रस्त्यावर ट्रंपेट वाजवून फेडलं 15 लाखांचं कर्ज, कोण आहेत वसंत पवार?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
वसंत पवार यांनी कुटुंबातील दुःख, कोरोनानंतरचे आर्थिक संकट, लाखो रुपयांचे कर्ज यावर ट्रंपेटच्या कलेच्या आधाराने मात केली आणि 15 लाख कर्ज फेडले.
मुंबई: आधी मुलगा नंतर नातू गमावला, आजारानं बायकोलाही नेलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झालं. कोरोनानं बिझनेस ठप्प झाला. डोक्यावर लाखो रुपयांचं कर्ज झालं. इतकं सगळं सोसलं पण कलेनं जगायला आधार दिला. कोरोनानंतर काम मिळेना त्यामुळे दारोदार फिरण्याची वेळ आली. मात्र त्यांची व्यथा पाहून ऐकून मदतीला लोक आली.
advertisement
कला माणसाला जगायला शिकवते, कठीण प्रसंगात तोंड द्यायला शिकवते. साताऱ्याच्या वाई तालुक्यातील शिरूर गावचे वसंत पवार हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. ज्याला ज्याला डिप्रेशन आलं, ताण आला, सगळं काही संपल्यासारखं वाटलं त्या प्रत्येकानं वसंत पवार यांच्या संघर्षाची कहाणी एकदा तरी वाचायला हवी. त्यांचा संघर्ष अक्षरश: शब्दात न सांगता येणारा आहे.
advertisement
advertisement
advertisement
दोन वर्षे काम नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवलं. याच काळात त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक आघात झाले. नातवाचा अपघात झाल्याने त्याच्या उपचारासाठी 13 ते 14 लाख रुपये खर्च करावे लागले. काही काळातच मुलाचा अपघातात मृत्यू झाला. गरोदरपणात मुलगीही दगावली. कुटुंबाची जबाबदारी पुन्हा वसंत पवार यांच्या खांद्यावर आली.
advertisement
आजही वसंत पवार पुणे आणि मुंबईतील लग्नसमारंभ, वाढदिवस, धार्मिक कार्यक्रम इत्यादी ठिकाणी ट्रम्पेट वाजवतात. कार्यक्रम नसेल तर वारजे, गुडलक चौकाजवळच्या हॉटेलांसमोर बसून ट्रम्पेट वाजवतात. अंगातील कला पाहून कोल्हापूर येथील प्रशांत कुलकर्णी यांनी पवार यांना एक नवीन ट्रम्पेट भेट दिली. त्यामुळे त्यांचा उत्साह आणखी वाढला.
advertisement