Gmail यूझर्सची मज्जा! फोनमध्ये आलं जादुई फीचर, आता हे काम होईल सोपं
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Gmail New Feature: जीमेलचा वापर करणाऱ्या कोट्यवधी ग्राहकांसाठी गुड न्यूज आहे. दीर्घकाळापासून ज्या आवश्यक फीचरी कमतरता होती, तेच फीचर आता मोबाईल अॅपमध्ये आणण्याची तयारी सुरु आहे. गुगलने आपल्या Gmail Android अॅपमध्ये अशा बदलाची टेस्टिंग केली आहे. ज्यामुळे यूझर्सना ईमेल व्यवस्थित करणे पहिल्यापेक्षा जास्त सोपे जाईल.
advertisement
advertisement
नवा अपडेट काय? : मीडिया रिपोर्टनुसा, गुगल आता अँड्रॉइड अॅपच्या आतच Custom Labels तयार करणे, त्यांना एडिट करणे आणि डिलीट करण्याचा फीचर आणणार आहे. अँड्रॉइड अथॉरिटीच्या रिपोर्टनुसार Gmail चे अँड्रॉइड व्हर्जन 2025.12.29.855765709 मध्ये पहिल्यांदाच हे फीचर पाहिले गेले होते. सध्या हे फीचर सर्वच यूझर्ससाठी रोलआउट केले गेले नाही. मात्र टेस्टिंग फेजमध्ये याला साइडबार मेन्यूमध्ये Create label च्या ऑप्शनच्या रुपात पाहिले जाऊ शकते.
advertisement
हे फीचर कसे काम करेल? : आतापर्यंत अँड्रॉइड यूझर्सना नवीन लेबल तयार करण्यासाठी कंप्यूटरचा वापर करावा लागत होता. तसंच, या नवीन अपडेटसह, यूझर्सच्या अ‍ॅपच्या साइडबारमधून थेट नवीन फोल्डर किंवा लेबल तयार करू शकतील. ते जीमेलच्या सेटिंग्जमध्ये जाऊन कोणत्याही विद्यमान लेबलचे नाव बदलू किंवा हटवू शकतात. डेस्कटॉप किंवा आयफोनवर तयार केलेले लेबल आता अँड्रॉइड अ‍ॅपवरून मॅनेज करणे सोपे होईल.
advertisement
ही बातमी खास का आहे? : सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे गुगलकडे स्वतःचे प्लॅटफॉर्म असूनही, अँड्रॉइड यूझरकडे हे मूलभूत फीचर नव्हते. iOS मध्ये ते वर्षानुवर्षे आहे. या अपडेटमुळे अँड्रॉइड आणि आयफोनमधील ही महत्त्वपूर्ण तफावत दूर होईल. तुमच्या माहितीसाठी, हे फीचर सध्या टेस्टिंग मोडमध्ये आहे, म्हणून गुगलने त्याच्या अधिकृत रोलआउटची तारीख जाहीर केलेली नाही. येत्या काही आठवड्यात ते सर्व अँड्रॉइड यूझर्ससाठी रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.









