Passkey की Password, अकाउंटसाठी सर्वात सुरक्षित काय? अवश्य घ्या जाणून
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Passkey Vs Password: पासवर्ड म्हणजे प्रत्येक ऑनलाइन अकाउंटसाठी तुम्ही सेट केलेले कॅरेक्टर, संख्या किंवा विशेष वर्णंचं मिश्रण असतं. तुमच्या अकाउंटसाठी तो सुरक्षेचा पहिला स्तर मानला जातो.
advertisement
पासवर्ड म्हणजे प्रत्येक ऑनलाइन खात्यासाठी तुम्ही सेट केलेला शब्द, संख्या किंवा विशेष वर्ण यांचं मिश्रण असतं. तुमच्या अकाउंटसाठी तो सुरक्षेचा पहिला स्तर मानला जातो. परंतु कालांतराने, पासवर्डमधील त्रुटी स्पष्ट झाल्या आहेत. लोक अनेकदा 123456, जन्मतारखी किंवा मोबाइल नंबर सारखे साधे पासवर्ड वापरतात, जे हॅकर्स काही सेकंदातच क्रॅक करू शकतात. पासवर्ड चोरी, लीक होणे किंवा फिशिंग ही एक सामान्य समस्या बनली आहे.
advertisement
Passkey म्हणजे काय आणि ते कसे काम करते? : पासकी ही एक नवीन, अधिक आधुनिक आणि सुरक्षित पद्धत आहे जी पासवर्डची आवश्यकता जवळजवळ काढून टाकते. ती फिंगरप्रिंट, फेस अनलॉक किंवा तुमच्या डिव्हाइसच्या लॉकसारख्या बायोमेट्रिक व्हेरिफिकेशनवर अवलंबून असते. तुम्ही वेबसाइट किंवा अॅपवर पासकी सेट करता तेव्हा तुमचा डेटा क्लाउडमध्ये नाही तर तुमच्या डिव्हाइसवर संग्रहित केला जातो. पासवर्ड टाइप करण्याची आवश्यकता नाही आणि तो लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही.
advertisement
advertisement
advertisement
advertisement









