कुणाला हवी देशी तर कुणाला इंग्लिश; पण दोन्ही दारूतील नेमका फरक, पिणाऱ्यांनाही माहिती नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
देशी आणि इंग्लिश दारूमध्ये नेमका फरक काय हे अनेकांना माहिती नाही.
advertisement
advertisement
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की भारतीय आणि इंग्रजी दारू बनवण्यामध्ये कोणताही फरक नाही. दोन्ही बनवण्याची पद्धतजवळपास सारखीच आहे. पण देशी दारू ही पारंपारिकपणे अनेक दशकांपासून सुरू असलेल्या प्रक्रियेद्वारे तयार केली जाते. बहुतेक ठिकाणी ते मोलॅसिस आणि इतर कृषी उत्पादनांपासून बनवली जाते. त्याचं योग्य किण्वन आणि ऊर्धपातन केलं जातं. याशिवाय देशी दारू पॉलिथिन शीट किंवा प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये पॅक केली जाते.
advertisement
देशी दारू शुद्ध किंवा डिस्टिल्ड असते. इंग्रजी दारू उत्पादक कंपन्या देखील स्थानिक दारू उत्पादक कंपन्यांकडून त्यांचं स्पिरिट खरेदी करतात. मात्र, नंतर त्यात वेगवेगळे फ्लेवर टाकून इंग्रजी दारू बनवली जाते. तर देशी दारूमध्ये कोणताही फ्लेवर वापरला जात नाही. म्हणून, ज्यापासून ते बनवले जाते तीच चव आहे. देशी दारूला उग्र वास येण्याचेही हेच कारण आहे. त्याचबरोबर इंग्रजी दारू काचेच्या बाटल्यांमध्ये भरून बाजारात नेली जाते.
advertisement
संपूर्ण देशात इंग्रजी दारूचे ब्रँड एकाच नावाने विकले जातात. पण देशी दारू देशाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. उदा., टॉल बॉय नावाची दारू पश्चिम बंगाल आणि झारखंडसारख्या पूर्वेकडील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकली जाते. याशिवाय हीर रांझा, घूमर, जीएम संत्रा आणि जीएम लिंबू पंच या नावांनीही विकला जातो.
advertisement








