World Dangerous Dog : जगातील 5 सर्वात धोकादायक कुत्रे, काही सेकंदात घेऊ शकतात जीव, त्यांच्यापासून दूर राहण्यातच शहाणपण

Last Updated:
1/8
कुत्रा हा माणसाचा सगळ्यात चांगाला मित्र आहे. तो विश्वासू आहे. तो आपल्या मालकावर जीव ओवाळून टाकतो, घराची रखवाली करतो आणि अनेक वेळा जीव धोक्यात घालूनही आपल्या मालकाचं रक्षण करतो. पण, जिथं एकीकडे कुत्र्यांचं असं विश्वासू रूप दिसतं, तिथंच कुत्र्याने माणसांवर किंवा लहानमुलांवर हल्या केल्याच्या अनेक घटना तुम्ही मागच्या काळामध्ये पाहिल्या असतील. यासंबंधीत अनेक व्हिडीओ देखील व्हायरल झाले, त्यामुळे आता लोक कुत्र्यांना घाबरुदेखील लागले आहेत.

advertisement
2/8
काही जाती अशा आहेत ज्या आपल्या आक्रमक स्वभावामुळे संपूर्ण जगभर धोकादायक कुत्र्यांच्या यादीत गणल्या जातात. अलीकडेच देशभरात कुत्र्यांच्या हल्ल्याचे वाढते प्रकार पाहता सर्वोच्च न्यायालयालाही यात हस्तक्षेप करावा लागला आहे. आज जाणून घेऊ या अशाच जगातील पाच सर्वात खतरनाक कुत्र्यांच्या जातींबद्दल.

3/8
1. रॉटवीलर (Rottweiler)रॉटवीलर ही जाती जगातील सर्वात ताकदवान आणि आक्रमक कुत्र्यांपैकी एक आहे. या कुत्र्यांचं शरीर अतिशय मजबूत आणि जबडे स्टीलसारखे मजबूत असतं. थोडाही धोका जाणवल्यास हे तत्काळ हल्ला करतात. रॉटवीलरला अनोळखी लोक किंवा इतर कुत्रे आवडत नाहीत. जर त्यांना मालकाचा राग किंवा भीती जाणवली, तर ते क्षणातच भयंकर बनतात.

4/8
2. पिटबुल (Pitbull)‘पिटबुल’ या नावातच त्यांचा स्वभाव दडलेला आहे. हट्टी, ताकदवान आणि लढाऊ. पिटबुल ही जात विशेषतः त्यांच्या आक्रमक वृत्तीमुळे ओळखली जाते. काही देशांमध्ये तर त्यांच्यावर बंदीही घालण्यात आली आहे. जरी हे आपल्या मालकांशी विश्वासू असतात, तरीही अनोळखी लोकांसाठी त्यांचा स्वभाव अनिश्चित आणि कधीही धोकादायक होऊ शकतो.

5/8
3. जर्मन शेफर्ड (German Shepherd)जर्मनीत उद्भवलेली ही जात आज संपूर्ण जगात लोकप्रिय आहे. पोलिस, आर्मी आणि रेस्क्यू ऑपरेशन्समध्ये जर्मन शेफर्डचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. हे कुत्रे बुद्धिमान, ताकदवान आणि अतिशय निडर असतात. मात्र, त्यांना धोका जाणवल्यास ते क्षणात आक्रमक बनतात आणि हल्ला करतात. त्यामुळे त्यांना योग्य प्रशिक्षण देणं अत्यावश्यक आहे.

6/8
4. चाउ-चाउ (Chow Chow)ही चीनमधील एक प्राचीन आणि अतिशय दुर्मिळ जात आहे. दिसायला मऊ, शांत वाटणारी ही जात प्रत्यक्षात फारच रागिट स्वभावाची आहे. त्यांना अनोळखी लोक आवडत नाहीत आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणी जवळ गेलं तर ते थेट हल्ला करतात. म्हणूनच या जातीच्या कुत्र्यांना
4. चाउ-चाउ (Chow Chow)ही चीनमधील एक प्राचीन आणि अतिशय दुर्मिळ जात आहे. दिसायला मऊ, शांत वाटणारी ही जात प्रत्यक्षात फारच रागिट स्वभावाची आहे. त्यांना अनोळखी लोक आवडत नाहीत आणि त्यांच्या परवानगीशिवाय कोणी जवळ गेलं तर ते थेट हल्ला करतात. म्हणूनच या जातीच्या कुत्र्यांना "स्वतःच्या मर्जीचे मालक" म्हटलं जातं.
advertisement
7/8
5. प्रेसा कॅनारिओ (Presa Canario)अफ्रिकेतील या प्रकारचे कुत्रे वजन आणि ताकदीसाठी प्रसिद्ध आहे. या कुत्र्याचं वजन साधारणपणे 60 किलोपर्यंत असू शकतं. प्रेसा कॅनारिओ अत्यंत आक्रमक आणि नियंत्रणाबाहेर जाणारी जात मानली जाते. एकदा हे कुत्रे हल्ला करताच एखाद्याचा जीव वाचवणं फार अवघड असतं.

8/8
कुत्र्यांची प्रत्येक जात वेगळी असते. काही जाती विश्वासू आणि प्रेमळ असतात, तर काही जातींना विशेष प्रशिक्षणाशिवाय पाळणं धोकादायक ठरू शकतं. म्हणूनच, पाळीव कुत्रा निवडताना त्याच्या स्वभाव, जाती आणि प्रशिक्षणाचा विचार करणे अत्यावश्यक आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement