भारतातील अद्भुत ठिकाण, जिथं दर 15 दिवसांनी फुलं रंग बदलतात; पाहा PHOTO
- Published by:Priya Lad
Last Updated:
तुम्ही रंगबेरंगी फुलं पाहिली असतील पण रंग बदलणाऱ्या फुलांबाबत तुम्ही कधी ऐकलं होतं का? भारतात असं एक ठिकाण आहे, जिथं फुलं आपला रंग बदलतात.
फुलांनी बहरलेलं ठिकाण म्हटलं की तुमच्यासमोर ते कास पठार. साताऱ्यातील कास पठार तुम्हाला माहितीच आहे. पण भारतात असं एक ठिकाण आहे, जे फुलांसाठी प्रसिद्ध आहे आश्चर्य म्हणजे इथं दर 15 दिवसांनी फुलं आपला रंग बदलतात. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स म्हणून ओळखलं जाणारं हे ठिकाण. दरवर्षी जगभरातून पर्यटक इथं भेट देण्यासाठी येतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
उत्तराखंडमधील चमोली इथं हे ठिकाण आहे. इथं जाण्यासाठी बद्रीनाथ महामार्गावरून गोविंदघाटाकडे जावं लागेल. तिथून पुलना पर्यंत रस्त्याने 3 किमीचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर हेमकुंड यात्रेच्या बेस कॅम्पमार्गे घाघरियाला जाण्यासाठी !1 किमी पायी प्रवास करावा लागतो. व्हॅली ऑफ फ्लॉवर्स इथून 3 किलोमीटर अंतरावर आहे. नोंदणी शुल्क म्हणून भारतीयांना 150 रुपये आणि परदेशींना 600 रुपये आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)