आपले प्रिन्सिपल गेले! परीक्षा नको म्हणून होळकर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी प्राचार्यांना केलं 'स्वर्गवासी'

Last Updated:
Students principal death fake news : परीक्षा रद्द व्हावी म्हणून दोन विद्यार्थ्यांनी असा प्रताप केला की संपूर्ण कॉलेजमध्ये गोंधळ उडाला. या प्रकरणी पोलिसातही गुन्हा दाखल करण्यात आला.
1/7
परीक्षा असली की सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात धाकधूक असते. काही विद्यार्थ्यांना तर काही तरी व्हावं आणि परीक्षा रद्द व्हावी असं वाटत असतं. अशीच इच्छा असलेले दोन विद्यार्थी ज्यांनी परीक्षा नको म्हणून असा प्रताप केला की सगळेच धक्क्यात आहेत.

advertisement
2/7
होळकर सायन्स कॉलेजच्या बीसीएच्या तृतीय वर्षाचे विद्यार्थी ज्यांनी परीक्षा थांबवण्यासाठी असा कट रचला की केवळ मुलंच नाही तर प्राचार्य देखील पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवतील.

3/7
दोन विद्यार्थ्यांची त्यांच्या परीक्षांमध्ये व्यत्यय आणण्याचा कट रचला. यासाठी त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांच्या मृत्यूची खोटी बातमी ऑनलाईन पसरवली. त्यांनी मोबाईलवरून एक खोटा मेसेज तयार केला. ज्यात लिहिलं होतं, होळकर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनामिका जैन यांचं निधन झालं आहे आणि हा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल केला.

4/7
काही मिनिटातच हा मेसेज वेगाने व्हायरल झाला आहे.  प्राचार्यांच्या मृत्यूच्या खोट्या बातमीमुळे संपूर्ण कॉलेजमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. कित्येक कॉलेज विद्यार्थ्यांनी यावर विश्वास ठेवला, कित्येक जण क्लासमधून निघून गेले. तर काहींनी प्रिन्सिपल ऑफिसमध्ये जाऊन माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला.

5/7
जेव्हा प्राचार्य डॉ. अनामिका जैन यांना हे कळलं तेव्हा त्यांनी स्वतः महाविद्यालयात जाऊन आपण जिवंत असल्याचं दाखवलं आणि ही अफवा असल्याचं समजलं. कॉलेजच्या प्राचार्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि तात्काळ भंवरकुआन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

6/7
कॉलेज प्रशासनाने या दिशाभूल करणाऱ्या माहितीची चौकशी केली तेव्हा असं आढळून आलं की परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांनी जाणूनबुजून रचलेला कट होता. पोलीस तपासादरम्यान मयंक कच्छवाल आणि हिमांशू जयस्वाल या दोन विद्यार्थ्यांची भूमिका समोर आली आहे.

7/7
ही घटना सोशल मीडियाद्वारे अफवा पसरवून शैक्षणिक संस्थेचे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांचं म्हणणं आहे. दोन्ही विद्यार्थ्यांविरुद्ध आयटी कायद्याच्या कलमांखाली आणि फसवणुकीखाली गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. (सर्व फोटो : सोशल मीडिया)

OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement