Knowledge : ढगांतून पाऊस पडतो खरा पण एका ढगात किती पाणी असतं?

Last Updated:
आकाशात काळे ढग दिसू लागले की पाऊस पडणार हे पक्कं असतं. ढगांत बाष्पीभवन होऊन साचेलेलं पाणी पावसाच्या स्वरूपात पडतं खरं पण एका ढगात किती पाणी असतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
1/7
बाष्पीभवन झालेल्या जमिनीवरील पाण्याचे ढग होतात आणि या ढगांना थंड वारा मिळाला की त्यातील पाणी पावसाच्या स्वरूपात पुन्हा जमिनीवर येतं. पाऊस पडण्याची ही प्रक्रिया आपणा सर्वांना माहिती आहे. पण एका ढगात किती पाणी असतं हे तुम्हाला माहिती आहे का?

advertisement
2/7
एका ढगात किती पाणी हे खरंतर त्या ढगाच्या आकारावर अवलंबून आहे. ढग प्रामुख्याने सिरस, क्युमुलस आणि स्ट्रेटस या तीन प्रकारचे असतात. ढगांचं स्वरूप आणि आकाराच्या आधारे ही नावं ठेवण्यात आली आहेत.

3/7
सिरस म्हणजे वर्तुळाकार. हे दररोज आकाशात दिसतात. हे ढग हलके असतात व बर्फाच्या कणांपासून बनलेले असतात. उन्हाळ्यात दिसणाऱ्या ढगांमध्येही बर्फाचे कण असतात. कारण त्या उंचीवर खूप थंडी असते.

4/7
क्युमुलसचा अर्थ ढीग असा होतो. त्यांच्या नावाप्रमाणेच हे ढग कापसाच्या ढिगाप्रमाणे दिसतात. ते गडद रंगाचे असतात तेव्हा यातून पाऊस किंवा गारपीट होऊ शकते. अशा ढगांना क्युम्युलोनिम्बस म्हणतात. यामध्ये अनेकदा अर्धा कोटी टनहून अधिक पाणी असतं.

5/7
क्युम्युलस ढगाचं सरासरी वजन अंदाजे 1.1 मिलियन पौंड किंवा 500,000 किलोग्रॅम असू शकतं. हे 100 हत्तींच्या वजनाइतकं आहे. या  ढगाची लांबी, रुंदी आणि उंची सुमारे 1 किलोमीटर (1000 मीटर) असते. त्यामुळे त्याचा आकार घन असतो.

6/7
1 घन किमी ढगाचं घनफळ 1 अब्ज घनमीटर (1000 मी x 1000 मी x 1000 मी = 1,000,000,000 m³) असतं. क्युम्युलस ढगांमध्ये पाण्याच्या थेंबांची घनता अंदाजे 0.5 ग्रॅम प्रति घनमीटर असते.

7/7
ढगाचा व्हॉल्युम (1 बिलियन चौरस मीटर), पाण्याची घनता (0.5 ग्रॅम/घन मीटर) यांचा गुणाकार केल्यास ढगातल्या पाण्याचं एकूण वजन मिळतं. ते 500 मिलियन ग्रॅम किंवा 500,000 किलोग्रॅम असतं. हे पाणी 100 हत्तींएवढ्या वजनाचं असतं.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement