Petrol : 100-200 रुपयांचा पेट्रोल तुम्ही गाडीत भरता का? मग तुमच्यासोबत दररोज होऊ शकते फसवणूक, वाहन असेल तर 'या' गोष्टी आधी लक्षात ठेवा
- Published by:Devika Shinde
Last Updated:
मीटर शून्यावरून सुरू झाला की सर्व काही व्यवस्थित आहे असं वाटतं. तरीदेखील इतकी खबरदारी घेतली तरी इंधन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात.
पेट्रोल पंपावर होणाऱ्या इंधन चोरीबद्दल तुम्ही ऐकलंच असेल. त्यासंबंधीत वेगवेगळे व्हिडीओ देखील तुम्ही पाहिले असतील. अशावेळी इंधन चोरीपासून वाचण्यासाठी लोक वेगवेगळे पर्याय सांगत असतात. त्यामुळे लोक आता थोडे सावध झाले आहेत. याच कारणामुळे आपण जेव्हा पेट्रोल किंवा डिझेल भरतो, तेव्हा बहुतेक वेळा आपली नजर मीटरवर आणि कान ‘क्लिक’ आवाजावर असते. मीटर शून्यावरून सुरू झाला की सर्व काही व्यवस्थित आहे असं वाटतं. तरीदेखील इतकी खबरदारी घेतली तरी इंधन फसवणुकीचे प्रकार दिवसेंदिवस वाढताना दिसतात.
advertisement
advertisement
1. राउंड फिगर संख्यामध्ये पेट्रोल भरु नका100, 200 किंवा 500 रुपयांसारख्या ‘गोल किंवा पूर्ण आकड्यां’मध्ये पेट्रोल भरणे टाळा. काही पंपांवर मशीनमध्ये छेडछाड करून अशा आकड्यांवर ग्राहकांची फसवणूक केली जाते. अशावेळी तुम्हाला पैशांप्रमाणे थोडं कमी इंधन मिळतं आणि ते लक्षातही येत नाही.यावर आणखी एक उपाय : पैशांऐवजी लीटरमध्ये पेट्रोल मागवा. उदा. “200 रुपयांचे पेट्रोल” म्हणण्याऐवजी “5 लीटर पेट्रोल” मागा.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


