भारतातील या मंदिरात 99 लाख 99 हजार 999 मूर्ती; 1 कोटी पूर्ण का नाही, एक कमी का, रहस्य काय?

Last Updated:
Mysterious Temple In India : एका मंदिरात 9999999 मूर्ती कशा, एक कोटीला एक कमी का ठेवली? भारतातील हे रहस्यमयी मंदिरांपैकी एक, ज्याच रहस्य, ज्याबाबत काही कथाही प्रचलित आहेत.
1/5
भारतात अशी अनेक रहस्यमय मंदिरे आहेत, ज्यांचं रहस्य आजपर्यंत उलगडलेले नाही. त्यापैकी एक मंदिर जिथं एकूण 99 लाख 99 हजार 999 मूर्ती आहेत. इतक्या मूर्ती कोणी, कधी बनवल्या आणि एक कोटी पूर्ण होण्यासाठी फक्त एकच मूर्ती हवी होती. मग ती का बनवली गेली नाही? असे प्रश्न पडतात.

advertisement
2/5
या मंदिराचे गूढ उलगडण्यासाठी अनेक विद्वानांनी खूप प्रयत्न केले, पण त्यांना यश आलं नाही. या मंदिरातील या मूर्तींबाबत अनेक कथा सांगितल्या जातात.

3/5
असं मानलं जातं की एकदा भगवान शिव एक कोटी देवदेवतांसह कुठेतरी जात होते. सर्व देव झोपी गेले. सकाळी भगवान शिव जागे झाले तेव्हा सर्व देव अजूनही झोपलेले होते. त्यांनी क्रोधित होऊन शाप दिला आणि सर्व देव-देवता दगडात बदलल्या. 

4/5
या मूर्तींबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. असं म्हमतात की, कालू नावाचा एक कारागीर होता. त्याला भगवान शिव आणि देवी पार्वतीसोबत कैलास पर्वतावर जायचं होतं. पण हे अशक्य होतं. कारागिराच्या आग्रहामुळे भगवान शिव म्हणाले की जर त्याने एका रात्रीत 1 कोटी देव-देवतांच्या मूर्ती बनवल्या तर ते त्याला आपल्यासोबत घेऊन जातील. त्यानंतर कारागिराने रात्रभर मूर्ती बनवल्या.

5/5
पहिल्या कथेत एक देव शापातून बचावला असं सांगितलं जात, तर दुसऱ्या कथेत सकाळपर्यंत एक कोटी मूर्ती बनवताना कारागिराची एक मूर्ती कमी पडली. एक कोटीला एक कमी म्हणून याला उनाकोटी असं नाव.  आता हे मंदिर कुठे आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हे उनाकोटी मंदिर आहे त्रिपुरामध्ये. त्रिपुराची राजधानी आगरतळापासून 145 किमी अंतरावर हे मंदिर आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement