मूर्ती वाढते, कावळे येत नाहीत आणि...! रहस्यांनी भरलेलं भारतातील मंदिर, अद्याप गूढ उकललं नाही
- Published by:Priya Lad
Last Updated:
भारतात अशी अनेक मंदिर आहेत, जे रहस्यांनी भरलेली आहेत. भारत म्हणजे विज्ञानाला आव्हान देणाऱ्या मंदिरांचे घर आहे, असं म्हणाला हरकत नाही. अशाच मंदिरापैकी एक हे मंदिर.
भारतातील रहस्यमयी मंदिरांपैकी एक मंदिर आहे, ते आंध्र प्रदेशात. कुरनूल येथील यागंती मंदिर. जे पंधरा शतकात विजयनगर साम्राज्याचे राजा हरिहर बुक्क राय यांनी बांधलं होतं. पण मंदिराचा इतिहास त्याहूनही जुना आहे. आख्यायिकेनुसार अगस्त्य ऋषींनी इथं भगवान व्यंकटेश्वराची मूर्ती स्थापित करण्याचा विचार केला होता.पण मूर्तीचा अंगठा तुटल्यामुळे स्थापना अर्धवट थांबवण्यात आली. निराश अगस्त्य ऋषींनी भगवान शिवाचं ध्यान केलं. त्यांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन, भगवान शिव यांनी त्यांना इथं त्यांचं मंदिर बांधण्याचे आशीर्वाद दिले.
advertisement
भगवान अर्धनारीश्वराला समर्पित हे मंदिर श्री यगंती उमा माहेश्वरी मंदिर म्हणूनही ओळखलं जातं. इथं शिव आणि पार्वती एकाच दगडात कोरलेल्या अर्धनारीश्वर रूपात विराजमान आहेत. हे कदाचित अशा प्रकारचं पहिलं मंदिर असेल जिथं भगवान शिवाची पूजा शिवलिंग म्हणून नव्हे तर मूर्ती म्हणून केली जाते. पण ते त्याच्या रहस्यांमुळे चर्चेत राहिलं आहे. मग नंदीचा आकार असो किंवा गोपूरममधील पाण्याच्या प्रवाह असो.
advertisement
या मंदिरात स्थापित केलेल्या दगडी नंदीच्या मूर्तीचा आकार सतत वाढत असल्याचा दावा केला जातो. दरवर्षी या नंदीचा आकार वाढत जातो. या मंदिराचे पुजारी म्हणतात की गेल्या काही वर्षांत नंदीच्या मूर्तीचा आकार लक्षणीयरीत्या वाढला आहे. त्यांनी स्पष्ट केलं की नंदीची मूर्ती पूर्वी लहान होती, पण आता ती इतकी मोठी झाली आहे की मंदिराचे काही खांब काढून टाकावे लागले.
advertisement
advertisement
सुंदर नैसर्गिक दृश्यांनी वेढलेले हे मंदिर आणखी एका खास वैशिष्ट्यासाठी ओळखलं जातं. इथं पुष्करणी नावाचा एक पवित्र झरा, जो वर्षभर वाहतो. या पुष्करणीतील पाणी कुठून येतं हे कोणालाही माहिती नाही. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी या पवित्र पाण्यात स्नान केल्याने सर्व पापं धुऊन जातात असा भाविकांचा विश्वास आहे.
advertisement
तसंच या मंदिरात कावळे येत नाहीत. हे अगस्त्य ऋषींच्या शापामुळे झालं आहे, असा स्थानिक लोकांचा विश्वास आहे. स्थानिकांच्या मते अगस्त्य ऋषी तपश्चर्या करत असताना कावळे त्यांना त्रास देत होते. संतापलेल्या ऋषींनी त्यांना शाप दिला की ते पुन्हा कधीही इथं येणार नाहीत. कावळ्यांना शनिदेवाचं वाहन मानलं जात असल्याने शनिदेव इथं राहत नाहीत.
advertisement


