नवरा करतो 30-40 लग्न अन् बायको सांभाळते सवती आणि शेकडो पोरं
- Published by:News18 Marathi
Last Updated:
या संप्रदायात अंदाजे दोन हजार जण आहेत. या संप्रदायातले पुरुष एक-दोन नव्हे, तर 30-40 लग्नं करू शकतात. या संप्रदायातल्या प्रमुख नेत्याचं कुटुंबही वेगळं आहे.
भारतात भाषा, संस्कृती, राहणीमान, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती अशा सर्वच बाबतींत विविधता आढळते. त्यातही ईशान्येकडचा भाग खूपच वैविध्यपूर्ण आहे. त्याचं एक उदाहरण म्हणजे मिझोराममधला चाना पावल हा आदिवासी ख्रिश्चन संप्रदाय. या संप्रदायात अंदाजे दोन हजार जण आहेत. या संप्रदायातले पुरुष एक-दोन नव्हे, तर 30-40 लग्नं करू शकतात. या संप्रदायातल्या प्रमुख नेत्याचं कुटुंबही वेगळं आहे. त्याविषयी जाणून घेऊ या.
advertisement
मिझोराममधले झिओना चाना हे चाना पावल या संप्रदायाचे एके काळी प्रमुख नेते होते. त्यांनी आपल्या 75 वर्षांच्या आयुष्यात 39 लग्नं केली आणि त्यातून त्यांना 94 मुलं झाली, ही त्यांची ओळख बनली. झिओना हे ज्या संप्रदायाचे नेते होते, त्या संप्रदायाला लालपा कोहरान थार किंवा चाना पावल छुआंथर कोहरान असंही म्हटलं जातं. जगभरात त्या संप्रदायाचे अंदाजे दोन हजार जण असून, त्या संप्रदायाशी जोडली गेलेली 400 ते 500 कुटुंबं आहेत. झिओना यांचं तीन वर्षांपूर्वी निधन झालं. त्यानंतर त्यांच्या भल्यामोठ्या कुटुंबाची आणि संप्रदायाची जबाबदारी त्यांच्या पहिल्या पत्नीवर आली.
advertisement
झिओना यांच्या पहिल्या पत्नीचं नाव जाथियांगी असं आहे. त्याच आता कुटुंबाच्या आणि संप्रदायाच्याही प्रमुख आहेत. झिओना यांचं दीड-दोनशे लोकांचं कुटुंब त्या सहजपणे सांभाळतात. जाथियांगी 17 वर्षांच्या असताना त्यांचं झिओना यांच्याशी लग्न झालं आणि त्या झिओना यांच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठ्याही आहेत. तेव्हापासूनच झिओना असतानाही जाथियांगीच कुटुंब सांभाळायच्या. जाथियांगी यांना 38 सवती आणि सगळ्यांची मिळून 94 मुलं आहेत. कुटुंबातल्या सर्वांकडून योग्य पद्धतीनं कामं करून घेणं आणि सर्वांना आवश्यक त्या सुविधा पुरवणं याकडे जाथियांगी जातीनं लक्ष देतात.
advertisement
advertisement
चाना पावल संप्रदायातही जाथियांगी यांची महत्त्वाची भूमिका असते. झिओना यांच्या मृत्यूनंतर संपूर्ण संप्रदाय, तसंच कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली. ती त्यांनी स्वीकारली आणि लोकांनीही त्यांना स्वीकारलं. कुटुंबाला शिस्त असेल, संपूर्ण घर एकत्र असेल, याकडे त्या लक्ष देतात. चाना पावल संप्रदायाच्या परंपरा आणि मूल्यांचं जाथियांगी या प्रतीक आहेत.
advertisement
advertisement
चरितार्थ चालविण्यासाठी हे कुटुंब शेतीही करतं. विशेष म्हणजे घरातील स्त्रिया केवळ घरात काम न करता शेतीही करतात. घरातल्या प्रत्येकाला त्यांच्या आवडीनुसार आणि कुवतीनुसार कामं वाटून देण्यात आलेली आहेत. झिओना यांच्या कुटुंबाकडे मोठी शेती आहे. त्यातून त्यांच्या कुटुंबाला पुरून उरेल इतकं धान्य ते पिकवतात. त्यामुळे त्यातूनच त्यांचा उदरनिर्वाहही चालतो.
advertisement
जाथियांगी यांच्या कुटुंबाला एका दिवशी 45 किलोपेक्षा अधिक तांदूळ, 25 किलो डाळ, 30-40 कोंबड्या, अनेक डझन अंडी, 60 किलो भाज्या लागतात. हे कुटुंब इतकं मोठं आहे, की त्यात दररोज सहज 20 किलो फळं संपतात. इतक्या मोठ्या कुटुंबासाठी लागणारं अन्न-धान्य जाथियांगी स्वतःच पिकवतात. त्यामुळे त्यांना फारसं काही बाहेरून आणावं लागत नाही.