advertisement

Tamhini Ghat : ताम्हिणी घाटाचं नाव कसं पडलं, अर्थ काय? संपूर्ण इतिहास

Last Updated:
Tamhini Ghat : आज ताम्हिणी घाट हा धबधबे, धुके, जैवविविधता आणि रम्य निसर्गासाठी ओळखला जाणारा महाराष्ट्रातील एक प्रमुख मान्सून पर्यटन मार्ग आहे. पण या घटाचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?
1/8
पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसरातून कोकणातील किनारी भागाकडे जाणारा ताम्हिणी घाट हा सह्याद्रीच्या पश्चिम घाटातील सर्वात प्राचीन आणि दाट जंगलांनी वेढलेला मार्ग मानला जातो.

2/8
ताम्हिणी हा मार्ग पूर्वीपासूनच आदिवासी, शिकारी आणि जंगलातील वनसंपत्ती गोळा करणाऱ्या जमातींसाठी महत्त्वाचा होता. घनदाट झाडे, खोल दऱ्या आणि सतत ओलसर हवामानामुळे हा प्रदेश नैसर्गिक किल्ल्यासारखा मानला जायचा.

3/8
मराठा साम्राज्याच्या काळात ताम्हिणी हा प्रमुख सैनिकी मार्ग नसला तरी स्थानिक पातळीवर कोकणातून घाटमाथ्याकडे जाण्यासाठी हा सुरक्षित उपमार्ग वापरला जायचा.

4/8
पेशवाई काळात या परिसरातील मध, औषधी वनस्पती आणि फळांचा व्यापार वाढला आणि ताम्हिणी मार्गाचं महत्त्व वाढलं. ब्रिटिशांच्या काळातही हा भाग दुर्गम असल्याने इथं मोठा रस्ता विकसित झाला नाही, भारत स्वतंत्र झाल्यानंतर हळूहळू संपर्क सुधारला.

5/8
सुमारे 2000 नंतर ताम्हिणी घाटाचं खरे रूप पालटलं. मुळशी धरण परिसर विकसित झाला, रस्ता रुंदावला आणि पर्यटनासाठी हा मार्ग मोठ्या प्रमाणात खुला झाला. इतिहास, लोककथा आणि निसर्ग यांचा सुंदर संगम हेच ताम्हिणीचं वैशिष्ट्य आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)

6/8
ताम्हिणी या नावाबद्दल अनेक कथा प्रचलित आहेत. काही लोकांच्या मते ताम्ही किंवा ताम्हण नावाच्या एका प्राचीन आदिवासी वस्तीवरून या परिसराला ताम्हिणी असं नाव पडलं.

7/8
काहींच्या मते इथं तपोभूमी म्हणून अनेक ऋषींचं आश्रम होतं, त्यामुळे तप-हिणी किंवा ताम्हीणी असा उच्चार पुढे बदलून ताम्हिणी झाला.

8/8
तसंच काही ठिकाणी ताम्हण झाडं विपुल प्रमाणात असल्यामुळेही नावाची सांगड घालण्यात येतं. यामुळे ताम्हिणी या नावाचा संबंध आदिवासी परंपरा, जंगल आणि अध्यात्म या तिन्हींच्या मिश्रणातून घडलेला दिसतो.

Shiv Sena UBT On KDMC : कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत्ते उघडले....
कल्याण-डोंबिवलीत शिंदे गटासोबत जाणार? मातोश्रीवरील बैठकीनंतर ठाकरे गटाने आपले पत
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग

  • शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली

  • ठाकरे गट कोणती भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

View All
advertisement