जमीनच नाही तर आकाशही हादरतं! पृथ्वीच्या वातावरणात काहीतरी भयंकर घडतं; कोल्हापूरच्या शास्त्रज्ञांचा धक्कादायक रिपोर्ट

Last Updated:
Thunder Impact On Earth Atmosphere : पृथ्वीवर भूकंप झाल्याच्या बऱ्याच घटना आहेत. नुकतीच दिल्लीत भूंकप झाल्याची घटना आहे. पण तुम्हाला वाचून धडकी भरेल फक्त जमीनच नव्हे तर आकाशातही हादरे बसतात. यामागील कारण असं की...
1/7
पृथ्वीच्या वातावरणात हादरे बसत आहेत. हे हादरे आहेत ते विजांचे. पावसाळ्यात विजा कडाडकात हे सगळ्यांना माहितीच आहे. काही वेळा या विजा पृथ्वीवर कोसळतातही. पण विजांच्या कडकडाटाचा फक्त पृथ्वीवरच नाही, तर पृथ्वीच्या वातावरणावरही परिणाम करत आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 60 ते 1 हजार किलोमीटर उंचीवर वातावरणातील वरचा थर ज्याला आयनोस्फिअर असं म्हणतात, त्याच्यावरही परिणाम होतो आहे.

advertisement
2/7
आकाशात जेव्हा जोरात विजा चमकतात तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते. विजेच्या या प्रवाहामुळे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून हजार किलोमीटर आकाशात वातावरणातील टोटल इलेक्ट्रॉन कंटेंट म्हणजे टीईसीमध्ये सुमारे 0.05 ते 0.80 टीईसी युनिटस्पर्यंत बदल नोंदवण्यात आला.  विजा चमकल्यानंतर साधारण 2 ते 35 मिनिटांच्या कालावधीत आयनोस्फिअरमध्ये हे बदल दिसून येतात. विजेची तीव्रता (करंट इंटेनसिटी ) जितकी जास्त असते, तितका या इलेक्ट्रॉनच्या घनतेवर होणारा परिणाम अधिक असतो, असं संशोधकांनी सांगितलं.

3/7
कोल्हापूरचं शिवाजी विद्यापीठ आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझमच्या संशोधकांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांसोबत मिळून हे संशोधन केलं.

4/7
इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटर म्हणजे एनआरएससीचं 'लाइटनिंग डिटेक्शन सेन्सर नेटवर्क' आणि जीपीएस (जीएनएसएस) डेटाचा वापर करण्यात आला.

5/7
आता याचा परिणाम काय? तर जीपीएस यंत्रणा, विमानांचे रडार आणि मोबाईल नेटवर्क ज्या उपग्रहांच्या सिग्नलवर चालतात, ते सिग्नल पृथ्वीवर येताना याच आयनोस्फिअरमधून प्रवास करतात. आपली मोबाईल कम्युनिकेशन यंत्रणा, जीपीएस आणि सॅटेलाईट नेव्हिगेशन हे सर्व आयनोस्फिअरमधील इलेक्ट्रॉनच्या स्थितीवर अवलंबून असतं. हे सिग्नल आयनोस्फिअरमधून पृथ्वीवर पोहोचतात.

6/7
जर विजांच्या कडकडाटाने या थरात बदल झाले, अडथळे निर्माण झाले, तर यामुळे मोबाईल सिग्नल यंत्रणा, जीपीएस व सॅटेलाईट नेव्हिगेशनवर परिणाम होण्याचा धोका वाढतो.  सिग्नलवर परिणाम होऊ शकतो, जीपीएस लोकेशनमध्ये चूक होऊ शकते किंवा कम्युनिकेशनमध्ये व्यत्यय येऊ शकतो, सॅटेलाईट सिग्नलच्या अचूकतेवर होऊ शकतो.

7/7
शास्त्रज्ञांच्या या शोधामुळे आता वादळी हवामानात सॅटेलाईट सिग्नलमध्ये होणारे बदल समजून घेणं सोपं होणार आहे. सॅटेलाईट कम्युनिकेशन आणि नेव्हिगेशन यंत्रणा सुधारण्यासाठी याचा उपयोग होईल. (सर्व फोटो : प्रतीकात्मक फोटो)

Nagpur News: 'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने नवरा तुरुंगात, आता थेट नगरसेवक!
'बुलडोजर पॅटर्न'नं घर पाडलं, दंगलीच्या आरोपात चार महिने तुरुंगात आता थेट नगरसेवक
  • यंदाच्या महापालिका निवडणुकीत अनेक घडामोडी घडल्या असून काही आश्चर्यकारक निकाल ला

  • बुलडोझरच्या धक्क्याने या कुटुंबातील एका महिलेला थेट महापालिकेच्या सभागृहात पोहोच

  • अलिशा खान यांच्या रूपाने 'बुलडोझर पॉलिटिक्स'ला मतदारांनी चपराक दिल्याची चर्चा

View All
advertisement