Vande Bharat : 'वंदे भारत'मध्ये मळके, फाटके कपडे घातलेला प्रवासी, आधार कार्ड पाहून टीटीही हैराण

Last Updated:
Beggar in Vande Bharat : वंदे भारत एक्सप्रेस या प्रीमियम ट्रेनमध्ये एका 'भिकारी'ला प्रवास करताना पाहून ट्रेनमधील प्रवासी, टीटी आणि इतर रेल्वे कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले.
1/9
सध्या देशातील सर्वात आलिशान ट्रेन म्हणजे वंदे भारत एक्सप्रेस. वेग आणि उत्कृष्ट सुविधांमुळे ती देशातील प्रीमियम ट्रेन बनली आहे. या ट्रेनमध्ये प्रवास करणं प्रत्येकासाठी जवळजवळ स्वप्नवत आहे.

advertisement
2/9
या ट्रेनचं भाडं आणि मागणी खूप जास्त असल्याने, अगदी सामान्य मध्यमवर्गीय व्यक्तीलाही इच्छा असूनही या ट्रेनमधून प्रवास करता येत नाही. त्यामुळे कोणीही सहज कल्पना करू शकत नाही की या ट्रेनमध्ये एक भिकारी प्रवास करत आहे.

3/9
'एक्सपेरिमेंट किंग' नावाच्या एका युट्यूब चॅनेलने अलीकडेच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात एक भिकारी शताब्दी आणि वंदे भारत या ट्रेनमध्ये दिसला. युट्यूब चॅनेलची संपूर्ण टीम शताब्दी आणि वंदे भारतमध्ये एकत्र भारत प्रवास करत होती. त्यांनी 5-6 सीट्स बुक केल्या होत्या.

4/9
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर थोडीशी शाई, लांब टॉवेल आणि मोठी बॅग घेऊन भिकाऱ्याने ट्रेन प्रवास सुरू केला. तो जयपूर रेल्वे स्टेशनवर पोहोचला. 12016 शताब्दी एक्सप्रेस जयपूर येथून संध्याकाळी 5.30 वाजता निघते आणि नवी दिल्लीला रात्री 9.30 वाजता पोहोचते.

5/9
शताब्दी एक्सप्रेस प्लॅटफॉर्मवर पोहोचताच भिकारी डब्यात चढला. कोचमध्ये प्रवेश करताच अटेंडंटने त्याला मध्येच थांबवलं. शिवराजने त्याचं तिकीट दाखवलं तेव्हा गार्डने त्याला पुढे जाण्याची परवानगी दिली. अचानक कोचमध्ये एक भिकारी दिसला तेव्हा सर्वजण आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. काही जण रागाने, द्वेषाने पाहत होते.

6/9
थोड्या वेळाने रेल्वे कर्मचारी शिवराजकडे आले. त्याने तू इथं राहू शकत नाहीस, अशी धमकी दिली. गोंधळ ऐकून टीटीही तिथं पोहोचला. शिवराजने टीटीला त्याचं तिकीट दाखवलं, आधार कार्डही दाखवलं. टीटीने तिकीट काळजीपूर्वक तपासलं आणि सांगितलं की तिकीट आणि आधार कार्ड दोन्ही बरोबर आहे. शेवटी गार्डने शिवराजची माफी मागितली, तू तसाच दिसतोस असं तो म्हणाला.

7/9
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6.23 वाजता तो चंदीगड-अजमेर वंदे भारत ट्रेनमध्ये चढला.  इथंही त्याला वंदे भारत ट्रेनमध्ये चढण्यापूर्वी गेटवर थांबवण्यात आलं. तीन वेळा तपासणी केल्यानंतर त्याला आत जाऊ देण्यात आलं. प्रत्येक गार्ड येऊन त्याला पुन्हा पुन्हा एकच गोष्ट विचारत होता, 'तुमची या ट्रेनमध्ये सीट आहे का?'

8/9
ट्रेन अजमेरला पोहोचताच आणि तो डब्यातून उतरताच, प्लॅटफॉर्मवर असलेल्या टीटीने त्याला पकडलं. तो वारंवार सांगतो की त्याच्याकडे तिकीट आहे. पण टीटीलाही त्यावर विश्वास बसत नाही. शेवटी त्याची बॅग उघडतो आणि तिकीट दाखवतो आणि तेव्हाच टीटी शेवटी त्याच्यावर विश्वास ठेवतो.

9/9
हा भिकारी म्हणजे खराखुरा भिकारी नाही. तर ज्या युट्युब चॅनेलने हा व्हिडीओ बनवला त्याच चॅनेलच्या टीममधील तो आहे. त्याचं नाव शिवराज असं आहे. भिकारीच्या वेशात त्याने शताब्दी आणि वंदे भारतसारख्या ट्रेनने प्रवास केला. यूट्यूब चॅनेल एक्सपेरिमेंट किंग अनेकदा असे विचित्र आणि आव्हानात्मक व्हिडिओ तयार करतं, ज्याचा मुख्य उद्देश मनोरंजन करणं तसंच विविध मुद्द्यांवर जनतेची त्वरित प्रतिक्रिया मिळवणं हा असतो.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement