6 महिने उपाशी राहिली, फक्त गरम पाणी प्यायची; कुटुंबाला कळाले नाही, 18 वर्षाच्या मुलीचा भयानक मृत्यू

Last Updated:
Girl Died Due To Weight Loss Diet: 18 वर्षाच्या श्रीनंदाने ट्यूबवरील वजन कमी करण्याच्या टिप्स पाहून जेवण सोडून दिले आणि फक्त गरम पाणी पिऊन जगण्याचा प्रयत्न करू लागली. यामुळे तिची तब्येत बिघडली आणि रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.
1/8
केरळच्या कन्नूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रीनंदा नावाच्या 18 वर्षीय तरुणीचा अन्नाशिवाय राहिल्यामुळे मृत्यू झाला आहे. ती यूट्यूबवरील वजन कमी करण्याच्या टिप्सवर अवलंबून होती आणि गेल्या काही महिन्यांपासून फक्त गरम पाणी पिऊन जिवंत होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, ती अॅनोरिझिया (Anorexia) या गंभीर आजाराने ग्रस्त होती.

advertisement
2/8
5-6 महिने उपाशी राहिली, कुटुंबालाही नव्हते कळले: श्रीनंदाने स्वतःला जाड असल्याची समजूत करून घेतली होती आणि वजन कमी करण्यासाठी भूक लपवण्याची सवय लावून घेतली होती. तिच्या कुटुंबियांनाही सुरुवातीला तिची ही स्थिती समजली नाही.

3/8
5 महिन्यांपूर्वी जेव्हा तिच्या प्रकृतीत मोठा बदल दिसून आला, तेव्हा तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला योग्य आहार घेण्याचा आणि मानसिक उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, तिने कुटुंबियांनी दिलेले अन्न टाळत राहिली आणि फक्त गरम पाणी पिऊन जगण्याचा प्रयत्न करत राहिली.

4/8
2 आठवड्यांपूर्वी प्रकृती ढासळली, 24 किलो वजनावर पोहोचली: गेल्या दोन आठवड्यांपूर्वी श्रीनंदाची तब्येत अचानक बिघडली. रक्तातील साखर धोकादायक पातळीवर गेली आणि तिला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला थालास्सेरी को-ऑपरेटिव्ह हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

5/8
डॉक्टरांच्या माहितीनुसार, तिचे वजन केवळ 24 किलो होते. तिचा रक्तदाब, साखर, आणि सोडियमची पातळी खूपच कमी झाली होती. तिला तातडीने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले, मात्र तब्येत सुधारली नाही आणि अखेरीस तिचा मृत्यू झाला.

6/8
डाएट ट्रेंडचा बळी! डॉक्टरांचा लोकांना इशारा: श्रीनंदाच्या मृत्यूनंतर आरोग्य तज्ज्ञांनी धोकादायक डाएट ट्रेंड आणि यूट्यूबवरील चुकीच्या माहितीबाबत लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

7/8
तज्ज्ञांच्या मते, वजन कमी करण्यासाठी आहारात मोठे बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा असे चुकीचे प्रयोग जीवावरही बेतू शकतात.

8/8
सोशल मीडियावरून मिळणाऱ्या डाएट टिप्स किती धोकादायक ठरू शकतात, हे श्रीनंदाच्या दुर्दैवी मृत्यूने दाखवून दिले आहे. त्यामुळे यापुढे कोणताही आहारतज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला न घेता वजन कमी करण्यासाठी अतिरेकी उपाय करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement