General Knowledge : OK, OK म्हणता पण याचा खरा फुलफॉर्म काय माहितीये?
- Published by:Priya Lad
Last Updated:
OK Fullform : ओकेचा फुलफॉर्म काय असा विचारला तर Okay असं तुम्ही म्हणाल. आपल्यापैकी कित्येकांनी वाचलं असेल, पण याचा खरा अर्थ, फुलफॉर्म आणि इतिहास वेगळाच आहे.
advertisement
advertisement
182 वर्षांपूर्वी अमेरिकन पत्रकार चार्ल्स गॉर्डन ग्रीन यांच्या लेखणीतून सर्वांत पहिल्यांदा OK हा शब्द जगासमोर आला. 1839 मध्ये कित्येक लेखकांनी बऱ्याच इंग्रजी शब्दांची संक्षिप्त रूपं वापरण्यास सुरुवात केली. आता ज्याप्रमाणे आपण LOL, ROFL, DND असे शॉर्टफॉर्म वापरतो, तसंच काहीसं. त्या वेळीच Oll Korrect म्हणून OK चा वापर करण्यात आला होता.
advertisement
advertisement
advertisement
यासोबतच OK शब्दामागे आणखीही बराच मजेशीर इतिहास आहे. 1840मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मार्टिन बॅन ब्यूरन यांच्या प्रचार यात्रेमध्ये OK शब्दाला निवडणूक घोषणेच्या रूपानं वापरण्यात आलं. वॅन ब्यूरन यांचं टोपणनाव ‘ओल्ड किंडरहुक’ असं होतं. याचा शॉर्टफॉर्म OK होत असल्यामुळे लोक प्रचारासाठी त्याचा वापर करत होते. त्या वेळी देशभरात ‘ओके क्लब’ही सुरू करण्यात आले होते.
advertisement


