Maharashtra Assembly Monsoon Session : जयंत पाटील आणि अजितदादा भेटले, नेमकं काय बोलले? विधानभवनात VIDEO व्हायरल
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Maharashtra Assembly Monsoon Session : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यामध्ये विधीमंडळ परिसरात चर्चा झाली.
मुंबई : महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी विरोधकांची मागणी होती. मात्र, या मागणीचा विरोध करत सरकारनं आधी ठरल्याप्रमाणं आजच अधिवेशन संपवण्याची मागणी केली. दुसरीकडे शेवटच्या दिवशी विधानसभा सदस्यांमध्ये खेळीमेळीचं वातावरण पाहायला मिळालं. विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुफ्तगू
विधीमंडळाच्या परिसरात आज अजित पवार आणि जयंत पाटील भेटले. यावेळी त्यांच्यामध्ये हास्यविनोद झाले. अजित पवार यांनी हळू आवाजात जयंत पाटील यांच्या कानात एक गोष्ट सांगितली. आणि काहीतरी असं झालं असं सांगितलं. यावर जयंत पाटील खळखळून हसत होते. त्याचवेळी तुमचा फोटो काढून बातमी करावी लागेल असाही सल्ला एका व्यक्तीने तिथे दिला त्यामुळे या दोघांच्यात नेमकी काय चर्चा झाली? हे येणारा काळच ठरवेल.
advertisement
विधानभवनात अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात गुफ्तगू pic.twitter.com/a4YOlEOuoK
— News18Lokmat (@News18lokmat) July 12, 2024
भाजपच्या महिला आमदाराचा व्हिडीओ व्हायरल
भाजपा आमदार मेघना बोर्डीकरांचा हा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत त्या फाईलमध्ये पैसे ठेवताना दिसत आहेत. हे पैसे नेमके कशासाठी ठेवले? याबाबत सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे. भाजपा आमदार राजेश पवार सभागृहात बोलत असताना पाठीमागच्या बाकावर भाजप आमदार मेघना बोर्डीकर बसलेल्या आहेत. यावेळी त्या एका फाईलवर स्वाक्षरी करतात. स्वाक्षरी केल्यानंतर त्या पैसे काढतात आणि त्यातील दोन नोटा फाईलमध्ये ठेवतात.
advertisement
आमदार मेघना बोर्डीकर यांचा खुलासा
view commentsव्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आमदार मेघना बोर्डीकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. "सकाळपासून सर्दी आणि कणकण वाटत असल्याने एका फोल्डरमध्ये औषधी आणण्यासाठी 1000 रुपये माझ्या PA कडे देण्यासाठी ठेवले होते. ते फोल्डर विधानसभेतील शिपायामार्फत माझ्या PA कडे सभागृहाबाहेर पाठविण्यासाठी दिले गेले. मात्र नेमका त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याचा आणि त्यातून गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकं करीत आहेत. हा प्रकार अनुचित आहे आणि सभागृहाचे पावित्र्य जपणारा नाही. माझी माध्यमांनाही विनंती आहे की बातम्या देताना किमान संबंधितांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे" असा खुलासा बोर्डीकर यांनी केला.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 12, 2024 4:18 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Maharashtra Assembly Monsoon Session : जयंत पाटील आणि अजितदादा भेटले, नेमकं काय बोलले? विधानभवनात VIDEO व्हायरल


