Dilip Patil Death: मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक दिलीप पाटील यांचे निधन
- Published by:Rohit Shinde
Last Updated:
मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचे निधन झाले आहे. गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. मराठा आंदोलनात महत्वाची भूमिका त्यांनी पार पाडली होती.
कोल्हापूर: राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा मुद्दा चव्हाट्यावर आला असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मराठा आंदोलक दिलीप पाटील यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांच्या जाण्याने मराठा आंदोलनाला मिळणारे बळ कमी होणार आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांचे काम सुरू होते. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक म्हणून बराच काळ त्यांनी जबाबदारी पार पाडली होती.
गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर मुंबईमध्ये उपचार सुरू होते. उपचारानंतर कोल्हापुरात आले असता पुन्हा त्रास झाल्यामुळे उपचारासाठी पुन्हा पुण्याला जात असताना वाटेतच त्यांचं निधन झालं. मराठा आरक्षण आणि ई डब्ल्यू एस संदर्भात दिलीप पाटील यांनी दिर्घकाळ न्यायालयीन लढाई लढली होती. मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईचे ते याचिकाकर्ते होते. मराठा अंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यापासून ते सारथी सक्षम करणे,अण्णासाहेब पाटील महामंडळ सक्षम करण्यासाठी त्यांनी लढा दिला होता. गुणरत्न सदावर्तेंच्या विरोधात देखील त्यांनी न्यायालयीन लढाई दिली होती.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 20, 2024 10:07 PM IST


