Ambadas danve : लक्षवेधीच्या माध्यमातून तहसीलदारांना ब्लॅकमेल? कथित ऑडिओ क्लिपवर दानवेंचा खुलासा
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ambadas danve : विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाने एका व्यक्तीने तहसीलदार ज्योती देवरे यांना ब्लॅकमेल केल्याचा प्रयत्न समोर आला आहे.
पुणे, (चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी) : गुरुवारपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. यात लक्षवेधी सूचना हा कळीचा मुद्दा समजला जातो. मात्र, अधिवेशन सुरू होण्याआधीच लक्षवेधी वरुन नवा वाद निर्माण झाला आहे. 'आपल्याविरोधात चुकीच्या माहितीच्या आधारे धादांत खोटी लक्षवेधी सुचना लावण्याचा प्रयत्न' झाल्याचा आरोप पुणे जिल्हा गौण खनिज अधिकारीपदाचा कार्यभार असलेल्या तहसिलदार ज्योती देवरेंनी केला आहे. त्याबाबतची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या पीएने हा कॉल केल्याचा दावा केला जात आहे. यावर आता खुद्ध अंबादास दानवे यांनीच खुलासा केला आहे.
व्हायरल झालेली ऑडिओ क्लीप माझीच : तहसीलदार ज्योती देवरे
होय, ती व्हायरल झालेली ऑडिओ क्लीप माझीच आहे, असा खुलासा तहसीलदार ज्योती देवरे यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना केलाय. मला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नावाने रामटेके यांच्याकडून माझ्याविरोधातील खोट्या लक्षवेधीचा ड्राफ्ट पाठवला गेला. म्हणून थेट फोन करून जाब विचारला त्याची ही ऑडियो क्लिप आहे. यानंतर दानवे यांनी मला याबाबत काहीच माहित नसल्याचंही देवरे म्हणाल्यात.
advertisement
मी कृषी विभागात असतानाही अशाच पद्धतीने औषध फवारणी ठेकेदारांनी मला घेरण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी प्रचंड घाबरून गेली होती. तोच प्रयोग पुन्हा माझ्यासोबत पुणे जिल्ह्यातील अवैध खानमाफियाकडून केला जातोय. त्याच खोट्या लक्षवेधीचा ड्राफ्ट मला पाठवून घाबरवण्याचा प्रयत्न होतोय, पण यावेळी मी अजिबात घाबरणार नाही, कर नाही त्याला डर कशाची?
advertisement
गेल्यावेळचीही लक्षवेधी मागे घेण्यासाठी माझ्याकडे 10 लाख मागितले गेले. म्हणून मी चिडले, आताही पुन्हा तोच प्रकार होत असेल तर मी अजिबात मागे हटणार नाही. या सर्व बोगस LAQ ब्लँकमेलिंग प्रकाराची रितसर चौकशी व्हावी, अशीच आपली मागणी आहे.
advertisement
विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयातून लक्षवेधी लावल्याबद्दल व्हायरल झालेल्या ऑडियोबद्दल खुलासा
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या कार्यालयातील पीए यांच्याकडून लक्षवेधी लावून त्रास देत असल्याबाबत पुणे तहसीलदार यांनी एक ऑडियो क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल केली आहे. प्रत्यक्षात अशा कोणत्याही प्रकारची लक्षवेधी विरोधी पक्षनेते यांच्या कार्यालयातून तहसीलदार ज्योती देवरे यांना व विधिमंडळ कार्यालयाला पाठविण्यात आली नाही. त्यामुळे तहसीलदार यांनी केलेले आरोप हे विरोधी पक्षनेते व त्यांच्या कार्यालयाला बदनामी करणारे आहेत. त्यामुळे माध्यम प्रतिनिधी मित्रांनी या खुलाशाची दखल घ्यावी.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
June 26, 2024 9:35 PM IST
मराठी बातम्या/Politics/
Ambadas danve : लक्षवेधीच्या माध्यमातून तहसीलदारांना ब्लॅकमेल? कथित ऑडिओ क्लिपवर दानवेंचा खुलासा