Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंना किती मतं पडली? पहिले आकडे आले समोर

Last Updated:

Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान पूर्ण झालं आहे. आता निकाल समोर आला आहे.

News18
News18
मुंबई : विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. संध्याकाळी सकाळी 9 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत विधानसभेतील सक्रिय 274 आमदारांनी गुप्त मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात होते. पहिले आकडे समोर येत आहेत.
कसा ठरतो मतदानाचा कोटा?
विधानसभेतील एकूण आमदारांची संख्या भागिले विधानपरिषदेतील रिक्त जागांची संख्या अधिक 1 या पद्धतीनं मतदानाचा कोटा ठरतो. राज्यात विधानसभेच्या एकूण जागा 288 आहेत. पण, लोकसभा निवडणुकीत विजयी झालेल्या काही आमदारांनी राजीनामे दिले आहेत. त्यामुळे आता हे संख्याबळ 274 वर आलं आहे. विधानसभेच्या एकूण जागा 274 जागांचा रिक्त जागा 11 +1 म्हणजेच 12 ने भागाकार केला तर 22.833 हे उत्तर येतं. त्यामुळे विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे.
advertisement
पक्षीय बलाबल कसं होतं?
महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप आहे. भाजपाचे 103 आमदार असून अपक्ष आणि मित्रपक्ष मिळून 111 संख्या होते. भाजपानं 5 जणांना उमेदवारी दिली आहे. त्यांचं संख्याबळ पाहात हे सर्व उमेदवार सहज निवडून येतील अशी परिस्थिती आहे. दुसरीकडे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाचे 38 आमदार आहेत. त्यांना 7 अपक्ष आणि बच्चू कडू यांच्या पक्षाच्या 2 अशा 9 आमदारांचा पाठिंबा आहे. महायुतीतील तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडे (अजित पवार) 39 आमदार आहेत. राष्ट्रवादीचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून मताचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना 7 आमदारांची गरज होती.
advertisement
महाविकास आघाडीकचं काय?
काँग्रेसचे 37 आमदार आहेत. या संख्याबळाच्या जोरावर काँग्रेसचा एक उमेदवार नक्की विजयी होईल. त्यानंतरही काँग्रेसकडं 14 मतं शिल्लक राहतील. ही मतं निर्णायक होती. शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा होता. राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे 13 आमदार आहेत. तर शेकापचा 1 आमदार आहे. तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 उमेदवार रिंगणात असून त्यांचे 15 आमदार आहेत. त्यामुळे ठाकरेंचे मिलींद नार्वेकर आणि शेकापचे जयंत पाटील यांना मतांची गरज होती.
advertisement
विधान परिषद उमेदवार मतदान -
परिणय फुके - ५
मिलिंद नार्वेकर - १७
भावना गवळी - ३
कृपाल तुमाने - ७
जयंत पाटील - १
शिवाजीराव गर्जे - ८
प्रज्ञा सातव - १४
अमित गोरखे - १२
पंकजा मुंडे - १०
सदाभाऊ खोत - ३
राजेश विटेकर - ४
योगेश टिळेकर - १२
view comments
मराठी बातम्या/Politics/
Vidhan Parishad Election : पंकजा मुंडेंना किती मतं पडली? पहिले आकडे आले समोर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement