30 वर्षांची परंपरा मोडणार की शिवसेना मुसंडी मारणार? जालन्यातील मतदार म्हणतात..
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Vidhan Sabha Election 2024: जालना विधानसभा मतदारसंघात यंदा पुन्हा अर्जून खोतकर आणि कैलास गोरंट्याल यांच्यात पारंपरिक सामना होतोय. यंदा कुणाची हवा आहे? याबाबत जाणून घेऊ.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: विधानसभा निवडणूक आता रंगतदार अवस्थेत पोहोचली आहे. सगळीकडे प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. मराठवाड्यावर सर्वच राजकीय पक्षांचे विशेष लक्ष असल्याचं पाहायला मिळतंय. जालना हा मराठवाड्यातील एक महत्त्वाचा मतदारसंघ आहे. जालन्यात काँग्रेसकडून कैलास गोरंट्याल तर शिवसेना शिंदे गटाकडून अर्जुन खोतकर आपलं नशीब आजमावत आहेत. इथं मागील 30 वर्षांपासून आमदार बदलण्याची परंपरा राहिली आहे. कैलास गोरंट्याल ही परंपरा मोडणार का? की शिंदे गटाचे अर्जुन खोतकर पुन्हा एकदा मुसंडी मारणार हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. जालन्यातील मतदारांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
advertisement
यंदा बदल हवाय
कैलास गोरंट्याल हे मागील 5 वर्षांपासून आमदार होते. याकाळात त्यांनी कोणताही विकास मतदारसंघांमध्ये केला नाही. ते बाहेर कुठेही दिसली नाहीत. त्यामुळे आम्हाला यावेळी बदल घडवायचा असून अर्जुन खोतकर यांना संधी देणार असल्याचं डोसा विक्रेते मयूर घोगडे यांनी सांगितलं. सरकारने शिक्षण क्षेत्रामध्ये सगळ्यांसाठी समानता आणावी. गुणवत्तेला प्राधान्य द्यावं, असं विद्यार्थी अर्जुन मेटकर याने सांगितलं.
advertisement
तुल्यबळ लढत
यावेळीची निवडणुकी अतिशय चुरशीची होणार आहे. कैलास गोरंट्याल आणि अर्जुन खोतकर ही दोन्हीही तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे कोण जिंकेल? हे निवडणुकीनंतरच कळेल. दोघांचीही 50-50 टक्के चान्सेस असल्याचे आणखी एका विक्रेत्याने सांगितलं. एकनाथ शिंदे यांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे त्याचे 1500 रुपये आमच्या काहीही कामाची नाहीत. कारण सरकारने 100 रुपये लिटर असलेले गोड तेल 140 रुपये लिटर पर्यंत नेलं आहे. आमच्याच पैशातून सरकार आम्हालाच पैसे देत असल्याचं सुरेश गोगडे यांनी सांगितलं.
advertisement
शेतीमालाला भाव द्या
शेतमालाला भाव नाही. दीड हजार रुपये महिन्याने काय होणार आहे. सरकार आमच्याकडूनच घेत आहे आणि आम्हालाच देत आहे. आम्हाला फक्त आरक्षण हवं आहे बाकी काही नाही असं सविता सिनगारे यांनी सांगितले. जालना शहराचा विकास होणे गरजेचे आहे. मेडिकल कॉलेज सुरू झालं असलं तरी त्याची इमारत होणे देखील गरजेचे आहे. शहरात पाणीपुरवठा आणि रस्ते हे देखील महत्त्वाचे मुद्दे असल्याचं ज्येष्ठ नागरिक विठ्ठल सोळंकी यांनी सांगितलं.
advertisement
दरम्यान, जालना शहरातील मतदारांची मतं पाहता अटीतटीचा सामना होण्याचा अंदाज आहे. परंतु, निवडणुकीच्या निकालानंतरच खरी हवा कुणाची हे समजणार आहे.
view commentsLocation :
Jalna,Maharashtra
First Published :
Nov 16, 2024 12:21 PM IST
मराठी बातम्या/Politics/
30 वर्षांची परंपरा मोडणार की शिवसेना मुसंडी मारणार? जालन्यातील मतदार म्हणतात..









