पुण्यात वारं फिरलं, शिवाजीनगर कुणाचं? तिरंगी लढतीत जनतेचा कौल कुणाला?
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असून महाराष्ट्रासह राज्याचे या निवडणुकाकडे लक्ष लागून राहिले आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : विधानसभेच्या निवडणुका आता तोंडावर आल्या असून अवघे 5 पाच दिवस राहिले आहेत तर प्रचाराला देखील तीन दिवस बाकी आहेत. राजकीय नेत्यांच्या सभा आणि प्रचार जोरदार सुरु आहेत. महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होत असून महाराष्ट्रासह राज्याचे या निवडणुकाकडे लक्ष लागून राहिले आहे. अत्यंत चूरशीची लढत ही होणार आहे. पुण्यातील अनेक मतदारसंघात काटे की टक्कर होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. पुण्यातील शिवाजीनगर मतदार संघ देखील तिरंगी लढत होत आहे. याच अनुषंगाने शिवाजीनगर मतदार संघातील नागरिकांची लोकल 18 च्या प्रतिनिधीने मते जाणून घेतली.
advertisement
भाजपचे असलेले आमदार सिद्धार्थ शिरोळे, काँग्रेसचे दत्ता बहिरट आणि अपक्ष (काँग्रेस बंडखोर) मनीष आनंद हे उमेदवार शिवाजीनगर मतदार संघातून लढत असून यांच्यात जोरदार लढत होणार असल्याचे पाहिला मिळत आहे. शिवाजीनगर मतदारसंघ दहा वर्षांपासून भाजपच्या ताब्यात आहे. भाजपचा पारंपारिक मतदारसंघ म्हणून देखील ओळखला जातो. तर इथे आता कोण निवडून येत याकडे सगळ्याच लक्ष लागून राहिले आहे.
advertisement
काय म्हणाले नागरिक?
आमच्या मतदार संघात पाणी 24 तास असतं. पाण्याचे प्रश्न नाहीत परंतु रस्ते, गटार, नोकरीचे प्रश्न हे सोडवले गेले पाहिजेत. आता भाजपकडून जे उमेदवार उभे आहेत त्यांचं काम चांगल आहे. त्यामुळे आम्ही एक हाती भाजपचा उमेदवार हा निवडून आणणार आहोत. तर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना सुरु केली ती देखील चांगली आहे.
advertisement
ज्यांना महिलांना नोकरी नाही त्यामुळे त्यांना थोडी घर कामात हातभार लावायला मदत होत आहे. त्यामुळे आम्ही भाजपला मतदान करणार आहोत अश्या प्रतिक्रिया येथील स्थानिक नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत. तसंच येथील आमदारांनी आमची कामे नाही केली. त्यामुळे आम्ही महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत, अशी प्रतिक्रिया येथील काही नागरिकांनी व्यक्त केली.
आता सगळ्यांना जी उत्सुकता लागली आहे ती निवडणुकीच्या निकाला नंतर स्पष्ट होऊन कोणाची सत्ता येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे. तर यंदाची निवडणूक अत्यंत चूरशीची होताना पाहिला मिळणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 15, 2024 7:15 PM IST









