‘आधार’चा पुरावा निराधार ठरणार, सरकारचा एक निर्णय अन् तुमचे हे दाखले रद्दच होणार
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
राज्य सरकारच्या महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला असून पुरावा म्हणून आधार कार्ड वापरलेल्या जन्म-मृत्यूच्या दाखल्यांची पुन्हा पडताळणी होणार आहे.
पुणे: राज्यात खोट्या कागदपत्रांवर मिळालेले, फक्त आधार कार्डाच्या आधारे दिलेले किंवा संशयास्पद वाटणारे जन्म आणि मृत्यू दाखले रद्द करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. महसूल विभागाने अशा दाखल्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी 16 मुद्द्यांवर आधारित फेरतपासणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. फेरतपासणीत शंका वाटणाऱ्या नोंदी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.
कागदपत्राची 16 मुद्द्यांच्या आधारे पडताळणी
राज्यात बेकायदेशीर मार्गाने किंवा खोट्या कागदपत्रांचा आधार घेऊन तयार करण्यात आलेले, तसेच फक्त आधार कार्डावर आधारित वाटणारे संशयास्पद जन्म-मृत्यू दाखले आता तपासले जाणार आहेत. महसूल विभागाने अशा सर्व नोंदींची 16 मुद्द्यांनुसार सविस्तर पडताळणी करण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
फक्त आधार कार्डाला पुरावा मानून जारी केलेले दाखले त्रुटीपूर्ण समजले जातील, कारण आधार कार्डात जन्मस्थान किंवा जन्माची खात्री करणारी माहिती नसते. त्यामुळे अशा दाखल्यांची पुन्हा तपासणी करून जेथे खोटे किंवा दिशाभूल करणारे कागदपत्र आढळतील, त्या नोंदी रद्द करण्यात येणार आहेत.
खोट्या नोंदी आढळल्यास ... कडक कारवाई
खोट्या नोंदी आढळल्यास बोगस जन्म–मृत्यू दाखले ताबडतोब रद्द केले जातील आणि लगेच पोलिसांत तक्रार दाखल होईल. अर्जातील माहिती आणि आधारवरील जन्मतारीख यामध्ये तफावत दिसली, तर संबंधित व्यक्तीवर थेट गुन्हा दाखल केला जाणार आहे. 11 ऑगस्ट 2023 नंतर नायब तहसीलदारांनी केलेल्या जन्म–मृत्यू नोंदी रद्द करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांच्या आधारावर महसूल विभागाने याबाबत विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिले आहेत.
advertisement
फरार घोषित करणार
ज्यांनी मूळ प्रमाणपत्र परत केले नाही किंवा जे ठिकाणी मिळत नाहीत, अशांची यादी तयार करून त्यांना फरार घोषित केले जाणार आहे. त्यांच्यावर स्थानिक पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात येणार आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 11, 2025 9:04 AM IST











