...म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज; अजितदादा स्पष्टच बोलले

Last Updated:

मोदी सरकारच्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार समर्थन केलं आहे.

News18
News18
पुणे, 1 सप्टेंबर : मोदी सरकारकडून आता ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची भूमिका घेण्यात आली आहे. मात्र याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होत आहे. विरोधी पक्षांचा विरोध सुरू असतानाच अजित पवार यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेचं जोरदार स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी ट्विट करत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ वर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.   
नेमकं काय म्हटलं अजित पवार यांनी? 
'प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनं मांडलेली ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिका देश आणि राज्यांच्या शाश्वत विकासासाठी पूरक आहे. देशात अनेक राज्यात सातत्यानं कुठेना कुठे निवडणुका होत असतात. यामुळे वेळ, पैसा, मनुष्यबळाचा अपव्यय होतो. विकासकामांकडे पुरेसं लक्ष देता येत नाही, त्यामुळे विकास खुंटतो. ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे  एकाचवेळी निवडणुका होतील आणि उर्वरित वेळ विकासकामांना गती देण्यासाठी उपयोगात आणता येईल. प्रधानमंत्री महोदयांनी वेळोवेळी मांडलेल्या आणि केंद्र सरकारनं आता पुढाकार घेतलेल्या ‘वन नेशन, वन इलेक्शन’ भूमिकेकडे सर्वांनी सकारात्मकपणे पहावं.'
advertisement
advertisement
'केंद्राची ही भूमिका समर्थनीय आणि स्वागतार्ह आहे. काळाप्रमाणे व्यवस्थेत सुधारणा अपरिहार्य असतात. परंतु त्या सुधारणा देश आणि लोकहिताच्या असल्या पाहिजेत. प्रधानमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली विद्यमान केंद्र सरकारनं ते धाडस दाखवलं आहे. केंद्राच्या या भूमिकेमुळे देशाच्या आणि राज्यांच्या समोरचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत होईल. विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्यास मदत होईल. यापूर्वी ‘वन नेशन, वन टॅक्स’ हा निर्णय मोदी जी यांच्या सरकारनं सर्व राज्यांच्या सहमतीनं अंमलात आणला आणि यशस्वी करुन दाखवला. त्याच धर्तीवर ‘वन नेशन, वन इलेक्शन’ ही भूमिका देशवासियांकडून मनापासून स्वीकारली जाईल असा विश्वास आहे. मी आणि राष्ट्रवादी काँग्रस पक्ष या भूमिकेचं स्वागत करतो.'
view comments
मराठी बातम्या/पुणे/
...म्हणून ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची गरज; अजितदादा स्पष्टच बोलले
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement