MPSC Success Story: रुममधली दुनियादारी! सर्व रूममेट बनले सरकारी अधिकारी, पुण्यातील दोस्तांची अनोखी स्टोरी
- Reported by:Prachi Balu Kedari
- local18
- Published by:Chetan Bodke
Last Updated:
Suraj Padwal Success Story: जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नसतं, हे वाक्य सार्थ ठरवत कराडच्या सुरज पडवळ यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळवत प्रशासनात आपली ओळख निर्माण केली आहे.
पुणे: जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल तर कोणतंही स्वप्न अशक्य नसतं, हे वाक्य सार्थ ठरवत कराडच्या सुरज पडवळ यांनी राज्यसेवा परिक्षेत यश मिळवत प्रशासनात आपली ओळख निर्माण केली आहे. सुरुवातीला राज्य कर विभागात एसटीआय (State Tax Inspector) म्हणून कार्यरत असलेल्या सुरज यांनी आणखी उंच भरारी घेत महाराष्ट्र राज्य सेवेतून एसएसटी (State Service Class One) या अधिकाऱ्याच्या पदावर निवड मिळवली आहे. विशेष म्हणजे, सुरज यांच्या यशामागे त्यांच्या मित्रमंडळींचा, विशेषतः रूममेट्सचा मोठा वाटा आहे. कारण त्यांच्या सर्व रूममेट मित्रांनीही स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होऊन विविध सरकारी पदांवर नियुक्ती मिळवली आहे.
मूळचे पाटणजवळील इरफळ येथील सुरज पडवळ यांचे वडील शिक्षक असून त्यांचे कुटुंब कराड येथे स्थायिक आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सुरज यांनी सुरुवातीला राज्य कर विभागात एसटीआय (State Tax Inspector) म्हणून कार्य केले. मात्र, तेवढ्यावर समाधान न मानता त्यांनी अधिक उंच भरारी घेण्याचा निर्धार केला. अखेर अखंड मेहनत आणि पाच प्रयत्नांनंतर त्यांना राज्य सेवा परिक्षेत यश मिळाले आणि आता त्यांची निवड जीएसटी कमिशनर पदासाठी झाली आहे.
advertisement
सुरज सांगतात, आम्ही पाच ते सहा जणांचा मित्रमंडळाचा ग्रुप होता. सर्वजण इंजिनिअरिंग करत होतो, पण 2017 मध्ये आम्ही ठरवलं की आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून अधिकारी व्हायचं. त्यानंतर सर्वांनी मिळून अभ्यासाला सुरुवात केली. त्या रूममधून प्रत्येकजण एकामागून एक अधिकारी बनत गेला, आणि तीच आमच्यासाठी प्रेरणा ठरली. या मित्रमंडळातील प्रसाद चौघुले यांची 2019 मध्ये उपजिल्हाधिकारी पदावर निवड झाली. राकेश यांची तहसीलदार म्हणून, गणेश यांची पीएसआय (Police Sub Inspector) पदावर, तर माझी यांची 2021मध्ये एसटीआय म्हणून नियुक्ती झाली.
advertisement
2023 मध्ये अनिकेत साखरे यांची एआरटीओ (Assistant Regional Transport Officer) पदावर निवड झाली. त्याचप्रमाणे सूरज गाढवे यांची लीगल मेट्रोलॉजी विभागात अधिकारी म्हणून, तर संकेत देसाई यांची महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती झाली. सगळे मित्र अधिकारी होत गेले, त्यामुळे मनात प्रेरणा वाढत गेली. अभ्यासाच्या काळात आम्ही एकमेकांना केवळ शैक्षणिक नव्हे, तर भावनिक आणि आर्थिक पाठबळही दिलं. घरच्यांची साथही नेहमी होती. हेच आमच्या यशाचं गमक आहे,असं सूरज भावूकपणे सांगतात. त्यांनी पुढे सांगितलं, ही माझी पाचवी अटेम्प्ट होती. अनेक वेळा अपयश आलं, पण सातत्य ठेवलं.
advertisement
कोणतीही गोष्ट मनापासून केली, तर यश मिळतंच. मित्रांची साथ, कुटुंबाचा विश्वास आणि स्वतःवरील श्रद्धा यामुळेच हे शक्य झालं. आज हे सर्व मित्र वेगवेगळ्या सरकारी विभागात अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एका साध्या रूममधून सुरू झालेला हा प्रवास आज प्रेरणेचं उदाहरण ठरल आहे. स्पर्धा परीक्षेच्या तयारीत असलेल्या असंख्य विद्यार्थ्यांसाठी सुरज पडवळ आणि त्यांच्या मित्रांचा हा प्रवास म्हणजे प्रेरणादायी आहे.
Location :
Maharashtra
First Published :
Nov 04, 2025 9:27 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
MPSC Success Story: रुममधली दुनियादारी! सर्व रूममेट बनले सरकारी अधिकारी, पुण्यातील दोस्तांची अनोखी स्टोरी








