पुण्यात हत्येचा थरार! चुलत भावाकडून तरुणाचा खेळ खल्लास, पोत्यात भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Pune: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरवाडी परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या सख्या चुलत भावाची निर्घृण हत्या केली आहे. भावाची हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी भावाचा मृतदेह पोत्यात भरून फेकून दिला. पुणे पोलिसांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
अजय पंडित असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर अशोक पंडित असं आरोपी चुलत भावाचं नाव आहे. हत्येची ही घटना उघडकीस येताच पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि आरोपी भाऊ अशोक पंडित याला पिंपरी चिंचवडमधून अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंडित आणि आरोपी अशोक पंडित हे दोघेही चुलत भाऊ आहेत. ते मूळचे झारखंड राज्यातील रहिवासी आहेत. कामानिमित्त दोघंही पुण्यात वास्तव्याला आहेत. त्यांच्यात मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. याच वादातून अशोकने अजयची निर्घृण हत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
ह्या क्रूर कृत्यानंतर आरोपी अशोक पंडित याने मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने अजयचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि ते पोतं भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणाऱ्या गुजरवाडी येथे आणून फेकून दिला. स्थानिक नागरिकांना संशय आल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला.
पोलिसांकडून तत्काळ आरोपीला अटक
advertisement
घटनेची माहिती मिळताच पुणे पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रं फिरवली. मृतदेह आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून पोलिसांना आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी वेगाने तपास चक्र फिरवत आरोपी अशोक पंडित याचा माग काढला. अखेरीस, आरोपी अशोक पंडित याला पोलिसांनी पिंपरी-चिंचवड परिसरातून अटक केली. चुलत भावानेच भावाची हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे. पण ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून केली. याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 21, 2025 9:06 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात हत्येचा थरार! चुलत भावाकडून तरुणाचा खेळ खल्लास, पोत्यात भयंकर अवस्थेत आढळला मृतदेह


