Pune News: बिबट्यानंतर पुणेकरांवर आता आणखी एक नवं संकट; घराबाहेर पडताना सावधान!

Last Updated:

आता घराबाहेर पडताना पुणेकरांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ते दोन गोष्टींमुळे

आता सापांचं संकट (प्रतिकात्मक फोटो)
आता सापांचं संकट (प्रतिकात्मक फोटो)
पुणे : बिबट्यामुळे आधीच दहशतीत असणाऱ्या पुणेकरांसाठी आता आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. आता घराबाहेर पडताना पुणेकरांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. ते दोन गोष्टींमुळे. पहिलं म्हणजे बिबट्या आणि आता त्यापाठोपाठ दुसरं म्हणजे साप. होय, थंडी ते उन्हाळा सुरू होईपर्यंत त्याच्या मिलनाचा काळ असतो. त्यामुळे आता यापासूनही नागरिकांना स्वतःचा बचाव करावा लागणार आहे. शहरातील औंध, पाषाण, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे आणि सूस या उच्चभ्रू परिसरात रविवारी एकाच दिवसात तब्बल 16 साप पकडण्यात आल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. सर्पमित्र अनिल कानसकर आणि संग्राम निकम यांनी हे सर्व साप पकडून त्यांना सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडले.
पकडलेल्या एकूण १६ सापांपैकी १२ साप हे अत्यंत विषारी घोणस जातीचे होते. तर उर्वरित सापांमध्ये दोन धामण, एक नाग आणि एक तस्कर जातीचा साप होता. थंडीचे दिवस हा घोणस सापांचा मिलनाचा काळ असल्याने त्यांचे प्रमाण अधिक असल्याचे सर्पमित्रांनी सांगितले. या काळात मादी विशिष्ट वास सोडून नराला आकर्षित करते, तर दोन नर मादीचे लक्ष वेधून घेण्यासाठी एकमेकांना विळखा घालून उंच उडी मारण्याचा प्रयत्न करतात.
advertisement
घोणस हा साप जाड आणि मंद गतीचा असतो, त्यामुळे अनेकदा नागरिकांना तो बिनविषारी अजगर असल्याचा गैरसमज होतो. मात्र, अजगर पूर्णपणे बिनविषारी असला तरी घोणस हा अत्यंत विषारी असतो, हे नागरिकांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.
advertisement
सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी, घराबाहेर, शेतात किंवा बागेत काम करताना नेहमी काळजी घ्यावी. कोणताही साप दिसल्यास त्याला मारण्याचा प्रयत्न न करता, तातडीने सर्पमित्र किंवा वनविभागाला संपर्क साधावा. दुर्दैवाने साप चावल्यास घाबरून न जाता, त्वरित आणि विलंब न करता रुग्णालयात उपचार घ्यावेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune News: बिबट्यानंतर पुणेकरांवर आता आणखी एक नवं संकट; घराबाहेर पडताना सावधान!
Next Article
advertisement
Raj Thackeray : बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
बाळासाहेबांची शपथ घेत राज ठाकरेंनी दिला मोठा शब्द, मुंबईत होणार राजकीय भूकंप?
  • महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणांची उलथापालथ सुरू आहे.

  • मनसे मुंबईत उद्धव यांची साथ सोडून थेट महायुतीला पाठिंबा देतील अशी चर्चा

  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे.

View All
advertisement