advertisement

नर्सने मित्राला वापरायला दिलं बँक अकाऊंट, त्याने केला असा प्रताप की ऐकूनच बसला धक्का, तिघांना अटक

Last Updated:

पोलिसांनी सांगली, मुंबई आणि अहमदाबाद विमानतळांवरून अत्यंत नाट्यमय पद्धतीने तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं. या फसवणुकीची रक्कम क्रिप्टोकरन्सी (USDT) मार्फत परदेशी मार्गांवर वळवली जात असल्याचं उघड झालं आहे.

बँक अकाऊंटचा गैरवापर
बँक अकाऊंटचा गैरवापर
पिंपरी-चिंचवड : सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता आणखी एक घटना समोर आली आहे. यात शेअर मार्केटमध्ये जास्त परताव्याचं आमिष दाखवून देशभरातील २६ हून अधिक नागरिकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणाऱ्या एका मोठ्या सायबर रॅकेटचा पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी सांगली, मुंबई आणि अहमदाबाद विमानतळांवरून अत्यंत नाट्यमय पद्धतीने तीन मुख्य आरोपींना ताब्यात घेतलं. या फसवणुकीची रक्कम क्रिप्टोकरन्सी (USDT) मार्फत परदेशी मार्गांवर वळवली जात असल्याचं उघड झालं आहे.
पिंपरी-चिंचवडमधील एका व्यक्तीची तब्बल 2 कोटी 10 लाख रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली होती, त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
परिचारिकेच्या खात्यातून 78 लाखांचे व्यवहार
पोलिसांच्या तपासामध्ये, फसवणुकीच्या रकमेतील मोठा हिस्सा हा 'क्लोन' बँक खात्यांमधून फिरवण्यात आल्याचे समोर आले. सांगलीतील एका परिचारिकेच्या बँक खात्यात तब्बल 78 लाख रुपये वळते करण्यात आले होते. चौकशीत परिचारिकेने हे खाते तिचा मित्र मोहम्मद सईद मोहोद्दीन पटेल (वय २५, रा. सांगली) याला वापरायला दिल्याचं सांगितलं.
advertisement
पटेल याने हे खाते 12 लाख रुपयांच्या मोबदल्यात विशाल ठक्कर ऊर्फ समर गुप्ता (वय २८, रा. ठाणे) याला वापरण्यासाठी दिलं होतं. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठिकाण बदलणाऱ्या समर गुप्ता याला पोलिसांनी मुंबईतून जेरबंद केलं.समर गुप्ताने हे 'क्लोन' बँक खातं हर्ष सुरेंद्रप्रताप भदोरिया ऊर्फ 'फॉर्च्यून' या मुख्य संशयितास दिलं होतं. हर्ष भदोरिया यालाही पोलिसांनी अटक केली आहे.
advertisement
या आंतरराष्ट्रीय सायबर रॅकेटच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस अधिक तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
नर्सने मित्राला वापरायला दिलं बँक अकाऊंट, त्याने केला असा प्रताप की ऐकूनच बसला धक्का, तिघांना अटक
Next Article
advertisement
Explainer : प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरिकेला! पाहा नेमकं काय घडलं?
प्रजासत्ताक दिनी भारताचा मोठा 'मास्टरस्ट्रोक', पाहुणे युरोपचे पण संदेश थेट अमेरि
  • प्रजासत्ताक दिनी झालेल्या संचालनात केवळ भारताची लष्करी ताकद दिसली नाही

  • तर बदलत्या जगाचं नवं राजकारणही पाहायला मिळालं.

  • भारताने जगाला दिलेला एक मोठा 'जिओपॉलिटिकल मेसेज' होता.

View All
advertisement