advertisement

संध्याकाळची वेळ; रस्त्यावर एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, कोंडीत रुग्णवाहिका अडकली अन्..पुण्यातील घटनेनं संताप

Last Updated:

संध्याकाळच्या भीषण कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली आणि तिला मार्ग काढण्यासाठी तब्बल पंधरा ते वीस मिनिटं लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत

वाहतूक कोंडीचा फाईल फोटो
वाहतूक कोंडीचा फाईल फोटो
पुणे : सातारा रस्त्यावरील बालाजीनगर आणि धनकवडी फाटा परिसरातील वाहतूक कोंडीने आता कहर केला आहे. याचा थेट फटका रुग्णांना बसत असल्याचं गंभीर चित्र आता समोर आलं आहे. गुरुवारी (२७ नोव्हेंबर) संध्याकाळच्या भीषण कोंडीत एक रुग्णवाहिका अडकली आणि तिला मार्ग काढण्यासाठी तब्बल पंधरा ते वीस मिनिटं लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. वाहतूक पोलीस ही कोंडी सोडविण्यात पूर्णपणे अपयशी ठरत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत.
बेशिस्त पार्किंग आणि उलट दिशेने वाहने
बालाजीनगर परिसर हा दाट लोकवस्तीचा आणि प्रचंड रहदारीचा भाग बनला आहे. येथून एक रस्ता धनकवडीकडे, तर पुढचे चौक के.के.मार्केट आणि संभाजीनगरकडे जातात. मात्र, या चौकातच रिक्षा थांबे, हातगाड्यांचे अतिक्रमण आणि दुचाकी-चारचाकी वाहनांची बेशिस्त पार्किंग असल्याने कोंडीत भर पडते.
advertisement
सायंकाळी ६:३० च्या सुमारास तर या चौकातून सुमारे एक किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. विशेष म्हणजे, अनेक वाहनचालक उलट्या दिशेने गाड्या चालवत असल्याने कोंडी अधिक गंभीर होते. गुरुवारी सायंकाळी कोंडी झाली असतानाही पोलीस 'बघ्याची भूमिका' घेत होते, असा नागरिकांचा आरोप आहे.
दक्षिण उपनगरांची स्थिती गंभीर
केवळ बालाजीनगरच नव्हे, तर दक्षिण उपनगरांमधील वाहतुकीची समस्या ही 'भिजत घोंगडे' ठरली आहे:
advertisement
कात्रज चौक, गजबजलेला बालाजीनगर आणि धनकवडी परिसर अरुंद रस्ते आणि पार्किंगच्या अभावामुळे कोंडला आहे.
भारती विद्यापीठ परिसर 'खाऊ गल्ली', फेरीवाले आणि शैक्षणिक संस्थांनी व्यापला असल्याने येथेही अरुंद रस्त्यांमुळे मोठी समस्या आहे.
आंबेगावची परिस्थितीही वेगळी नाही.
लाखोच्या घरात गेलेली वाहनांची संख्या पाहता, दक्षिण उपनगरांमधील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची गरज नागरिक व्यक्त करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
संध्याकाळची वेळ; रस्त्यावर एक किमीपर्यंत वाहनांच्या रांगा, कोंडीत रुग्णवाहिका अडकली अन्..पुण्यातील घटनेनं संताप
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement