Pune News: नवले पूल अपघातानंतर मोठा निर्णय, पुण्यातील ‘हा’ रस्ता कायमचा बंद!
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Pune News: नवले पूल अपघातानंतर प्रशासन सतर्क झाले असून महामार्गावरील अपघात टाळण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. आता एक रस्ता कायमचा बंद केला आहे.
पुणे : नवले पूल परिसरातील अपघातांची वाढती मालिका लक्षात घेऊन प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरून सेल्फी पॉइंटमार्गे नन्हे येथील मानाजीनगरकडे जाणारा रस्ता गुरुवारपासून कायमस्वरूपी बंद करण्यात आला आहे. या बदलामुळे साताऱ्याकडून पुण्याकडे येताना नन्हे परिसरात जाणाऱ्या वाहनचालकांना आता स्वामिनारायण मंदिर लगतच्या सर्व्हिस रोडचा वापर करावा लागणार आहे.
अपघातांना आळा घालण्यासाठी मोठा निर्णय
गेल्या काही महिन्यांपासून नवले पुल परिसरात अपघाताच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली होती. या अपघातांच्या विरोधात नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने तातडीने कारवाई करत मानाजीनगरकडे जाणारा मार्ग कायमस्वरूपी बंद केला.
advertisement
दरम्यान, हा तातडीचा बदल झाला असला, तरी पुढील काळात दीर्घकालीन उपाययोजनांवर लक्ष देण्याची गरज आहे. स्वामिनारायण मंदिर ते वारजे पूल या दरम्यानच्या संपूर्ण रस्त्याचे नवीन नियोजन करून, दर्जेदार आणि सुरक्षित असा एलिव्हेटेड पूल उभारण्याची मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.
सर्व्हिस रस्त्यावर वाढणार ताण
नवले पुलाच्या मार्गात झालेल्या बदलामुळे स्वामिनारायण मंदिराजवळील सर्व्हिस रस्त्यावर काही काळ वाहतुकीचा ताण वाढण्याची शक्यता आहे. रस्ता बंद झाल्यानंतर सर्व वाहने याच मार्गावरून वळवली जात असल्याने गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
advertisement
पूर्वी बंद केलेल्या रस्त्यावरून अनेक वाहनचालक धोकादायक पद्धतीने वळण घेत असल्याने अपघातांची भीती होती. आता हा मार्ग कायम बंद झाल्यामुळे गंभीर अपघातांचा धोका कमी होईल आणि सर्व्हिस रस्त्यावर वाहतूक सुरळीत राहील, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Nov 28, 2025 7:49 AM IST









