Whatsapp Chat, वानवडीत कट ते हत्येनंतर कपडे कुठे फेकले? आयुष कोमकर प्रकरणाला वेगळं वळण; पोलिसांनी कोर्टात सगळंच सांगितलं
- Published by:Prachi Amale
Last Updated:
वृंदावनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर, सोनाली आंदेकर या तिघींचाही गुन्ह्यात थेट सहभाग नसल्याच पोलीस तपासात समोर आले आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी
पुणे : आयुष कोमकर हत्या प्रकरण मोठी अपडेट समोर आली आहे. कोमकर हत्येप्रकरणी वृंदवनी वाडेकर, लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली वनराज आंदेकर या तिघींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बंडू आंदेकरसह इतर सर्व आरोपींना 29 सप्टेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या तिघींचाही गुन्ह्यात थेट सहभाग नसल्याच पोलीस तपासात समोर आल्याने त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.
advertisement
वनराजची पत्नी सोनाली आंदेकरचा यात कोणताही थेट सहभाग नाही. पुरवणी जबाबच्या आधारावर तिला अटक करण्यात आल्याच कोर्टाच म्हणणं इतर सर्व आरोपींचा तपास होणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व पुरुष आरोपींना न्यायालयाने 29 सप्टेंबरपर्यत पोलिस कोठडी सुनावली
न्यायालयीन कोठडी कोणाला देण्यात आली?
- वृंदावनी वाडेकर
- लक्ष्मी आंदेकर
- सोनाली आंदेकर
पोलीस कोठडी कोणाला दिली?
advertisement
- बंडू आंदेकर
- कृष्णा आंदेकर
- शिवम आंदेकर
- अभिषेक आंदेकर
- शिवराज आंदेकर
- तुषार वाडेकर
- स्वराज वाडेकर
- अमन पठाण
- सुजल मेरगू
आतापर्यंतच्या तपासात काय समोर आलं?
तपास अधिकारी कोर्टात आपली बाजू मांडताना म्हणाले, सुजल- अमन यांचे मोबाईल मित्रांकडून जप्त केले आहेत. वनराजच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच आयुषचा खून आणखी पुढे असं काही करणार आहेत का किंवा त्याच अनुषंगाने इतर दिशेने तपास करायचा आहे. 28 तारखेला आरोपी वानवडीत विशिष्ट ठिकाणी जमले होते. व्हॉट्सॲप चॅट आढळून आले आहेत. द्वारकेला कसे कुठून कुणा मार्फत गेले याचा तपास करायचा आहे. आरोपी मोबाईल घरी ठेवून एकमेकांना भेटायचे. तसेच फायरिंग ची प्रॅक्टिस कुठे केली याचा शोध घ्यायचाय आहे. आरोपींनी फायरिंग केल्यानंतर कपडे भीमा नदीच्या इथे फेकले पावसामुळे ते शोधणं अवघड होत आहे.
advertisement
आरोपींचे वकील काय म्हणाले?
आरोपीची बाजू कोर्टात मांडताना वकील म्हणाले, आमच्याकडील सर्व माहिती दिली आहे, काहीही रिकव्हरी बाकी नाही, तपासात आम्ही सहकार्य करतोय. Cctv फुटेजच्या विश्लेषणासाठी पोलीस कोठडीची गरज नाही. हे गँगवॉर नाही, जाणून बुजून संपूर्ण कुटुंबाला गोवले आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 18, 2025 8:20 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
Whatsapp Chat, वानवडीत कट ते हत्येनंतर कपडे कुठे फेकले? आयुष कोमकर प्रकरणाला वेगळं वळण; पोलिसांनी कोर्टात सगळंच सांगितलं