आधी बहिणीची छेड, मग भावावर कोयत्याने वार, बारामतीच्या VP कॉलेजमध्ये रक्तरंजित राडा, सराईत अटकेत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे जिल्ह्याच्या बारामतीत विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडे आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती.
जितेंद्र जाधव, प्रतिनिधी बारामती: पुणे जिल्ह्याच्या बारामतीत विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात मुलीची छेडछाड केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या भावावर लोखंडी कडे आणि कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना वर्षभरापूर्वी घडली होती. तब्बल एक वर्षापासून फरार असलेला सराईत गुन्हेगार अखेर बारामती तालुका पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
मागील वर्षीय १५ जानेवारी रोजी घडलेल्या या संतापजनक घटनेत फिर्यादी आपल्या अल्पवयीन बहिणीची छेडछाड केल्याबाबत आरोपीला जाब विचारण्यासाठी विद्या प्रतिष्ठान कॉलेज परिसरात गेला होता. यावेळी आरोपींनी त्याच्यावर हातातील लोखंडी कडे आणि धारदार कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.
या घटनेप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गौरव दिलीप टेंगले (रा. म्हसोबाचीवाडी, पणधरे, ता. बारामती, जि. पुणे) हा गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देत होता. मात्र गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि त्यांच्या टीमने गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी परिसरातून आरोपीस अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे अटक करण्यात आलेल्या आरोपीवर यापूर्वीही भिगवण पोलीस ठाणे, बारामती तालुका पोलीस ठाणे आणि बारामती शहर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. असा हा सराईत गुन्हेगार विद्या प्रतिष्ठान सारख्या कॉलेजमध्ये घुसून मुलींची छेड काढत होता. त्याला जाब विचारलं असता त्याने मुलीच्या भावावर कोयत्याने वार केले होते.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 12:22 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
आधी बहिणीची छेड, मग भावावर कोयत्याने वार, बारामतीच्या VP कॉलेजमध्ये रक्तरंजित राडा, सराईत अटकेत









